घरमहाराष्ट्रनाशिक’नीट’साठी ड्रेसच्या बाह्यांसह कापल्या रिंग्ज

’नीट’साठी ड्रेसच्या बाह्यांसह कापल्या रिंग्ज

Subscribe

कठोर नियमांचा परीक्षार्थींना मनस्ताप, अनेकांना परीक्षेविनाच फिरावे लागले माघारी

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी, ५ मे रोजी राज्यभरात घेण्यात आलेल्या नीट (नॅशनल एलिजीबिलीटी कम एण्ट्रन्स टेस्ट) परीक्षेचे कठोर नियम परीक्षार्थींसाठी तापदायी ठरले. त्यामुळे पुरेशा तयारीविना परीक्षा केंद्रावर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. दरम्यान, नाशिकमध्ये २७ परीक्षा केंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी १४ हजार ७०० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्या मार्फत राज्यातील मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक व ठाणे अशा १७ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. प्रवेशासाठीची चुरस लक्षात घेता, विद्यार्थ्यांकडून अनेक दिवसांपासून अभ्यास सुरू होता. दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुपारी १२ पासून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येत होता. या परीक्षेसाठी केंद्रात येताना कोणते निकष पाळावेत, याची संपूर्ण माहिती परीक्षार्थींना आधीच दिलेली होती. मात्र, तरीही अनेक विद्यार्थी पुरेशा तयारीविनाच परीक्षेसाठी आल्याचे दिसून आले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची त्यात अधिक संख्या होती. अनेक मुलांसह मुलींनीही लांब बाह्या असलेले कपडे घातलेले होते. तसेच, काही मुलींच्या कानात व नाकात रिंग्ज होत्या. अशा विद्यार्थ्यांना नियमानुसार परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी आणि व्हिडिओ शुटिंग होत असल्याने अत्यंत काटेकोरपणे तपासणीनंतरच प्रवेश दिला जात होता.

- Advertisement -

नाशिकमध्ये १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नाशिकमध्ये २७ परीक्षा केंद्रांवर १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण होते. तर चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंगनुसार एका गुणाची कपात होणार आहे. फिजिक्स व केमिस्ट्री विषयाचे प्रत्येकी ४५ प्रश्न विचारण्यात आले. बायोलॉजी (बॉटनी व झुलॉजी) विषयाच्या ९० प्रश्नांसाठी ३६० गुण होते. एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा घेतली गेली. ६ जूनला परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

डॉक्टर दाम्पत्याची ३२ परीक्षार्थींना मदत

नेहरुनगर येथील केंद्रावर बहुतांश परीक्षार्थी हे ग्रामीण भागातून आलेले होते. त्यातील अनेकांनी नियमच वाचलेले नसल्याने काहींना ड्रेसकोडमुळे तर काहींना धातुच्या वस्तूंमुळे प्रवेश मिळणार नव्हता. या वेळी मुलीला सोडवण्यासाठी आलेल्या डॉ. नागेश व मंजिरी मदनूरकर यांनी तातडीने आपल्या गाडीतील वैद्यकीय साधनांद्वारे ३० परीक्षार्थींच्या ड्रेसच्या लांब बाह्या कापल्या. तसेच, त्यातील काही मुलींच्या कान व नाकातील रिंग कापून दिल्या. परीक्षा केंद्र चुकलेल्या दोन विद्यार्थ्यांनाही त्यांनी वडनेर गेट येथील केंद्रात सोडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -