घरमहाराष्ट्रनाशिकRTE वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत प्रवेशाची शेवटची संधी

RTE वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत प्रवेशाची शेवटची संधी

Subscribe

जिल्ह्यात अद्याप 1 हजार 872 जागा रिक्त आहेत. प्रवेशाचे ऑनलाईन सद्यस्थिती पाहण्यासाठी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या कॉलममध्ये प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकल्यास प्रवेशाच्या तारखेची माहिती मिळू शकेल.

    शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रतिक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत प्रवेश घेण्याची अखेरची संधी आहे. इंग्रजी शाळांमध्ये नर्सरी आणि पहिलीसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्यातल्या 447 शाळांमध्ये साडेपाच हजार जागा आहेत. त्यापैकी 3 हजार 685 प्रवेश निश्चित झाले असून, प्रतिक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अवघे चार दिवस राहिले आहेत. जिल्ह्यात अद्याप 1 हजार 872 जागा रिक्त आहेत. प्रवेशाचे ऑनलाईन सद्यस्थिती पाहण्यासाठी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या कॉलममध्ये प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकल्यास प्रवेशाच्या तारखेची माहिती मिळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -