घरमहाराष्ट्रनाशिकघरघुती गणपती विसर्जनासाठी "टँक ऑन व्हिल" उपक्रम

घरघुती गणपती विसर्जनासाठी “टँक ऑन व्हिल” उपक्रम

Subscribe

नाशिक महापालिकेचा फिरता विसर्जन कुंड थेट आपल्या घरपोच सेवा देणार

नाशिक : घरघुती गणरायाच्या विसर्जनासाठी नाशिक महापालिकेच्यावतीने फिरत्या विसर्जन रथाची व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत टँक ऑन व्हील्स हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील सहाही विभागांमध्ये सकाळी १० ते सायंकाळपर्यंत हा विसर्जन रथ असेल . फोन केल्यास हा रथ थेट आपल्या घरापर्यंत येउन मुर्ती संकलन करेल.

नाशिकमध्ये सध्या कोरोना आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट आहे. गणपती विसर्जनावेळी वाढती गर्दी बघता,रुग्ण अधिक वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे फिरता विसर्जन रथाचा हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या रथातच गणपतीचे विसर्जन करून,मूर्ती ही संकलित केल्या जातील.यामुळे पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन होईल.तसेच आपल्या आरोग्याची ही काळजी घेता येईल आणि गर्दीत जाणे टाळता येईल. नाशिक शहरातील सर्वच नागरिकांनी या फिरत्या विसर्जन रथाला प्रतिसाद द्यावा,आपल्या विभागात जर रथ हवा असेल तर, विभागनुसार संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधावा असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ आवेश पल्लोड यांनी केले आहे.

- Advertisement -

ज्या ठिकाणी विसर्जन कुंड असतात.त्या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.आणि यामुळे आरोग्याचा ही प्रश्न निर्माण होतो. कोरोना,स्वाईन फ्ल्यू हे संसर्गजन्य रोग गर्दीच्या ठिकानाहून जास्त फैलावतात.त्यामुळे ही काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.तसेच काही नैसर्गिक कुंडांमध्ये विसर्जन.करताना लहान लहान मुले पाण्यात उतरतात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात.अशा ही अनेक घटना मागील काळात समोर आल्या आहेत.त्यामुळे या अनोख्या उपक्रमाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग निहाय संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे

पंचवटी, संजय दराडे- 9763257778
नाशिक पश्चिम संजय गोसावी- 9423179176
नाशिक पूर्व, सुनील शिरसाठ- 9423179173
नाशिक रोड, अशोक साळवे- 9423179172
नवीन नाशिक, संजय गांगुर्डे- 9423179171
सातपूर, श्रीमती. माधुरी तांबे- 9423179175

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -