घरपालघरअनधिकृत रेती उपसा करणार्‍या बोटी जिलेटिनने उडवल्या

अनधिकृत रेती उपसा करणार्‍या बोटी जिलेटिनने उडवल्या

Subscribe

महसूल आणि पोलीस प्रशासनाने वेगवेगळे पथक तयार करून विरार मधील बंदरांवर छापे टाकले,यावेळी पकडण्यात आलेल्या बोटींना चक्क जिलेटिनने उडवले आहे. अनधिकृतपणे रेती उपसा करणार्‍यांवर यापुढेही कारवाई सुरूच असेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

विरार: विरारजवळील रेती बंदरांमध्ये अनधिकृतपणे सक्शन पंपाद्वारे बेसुमार रेती उपसा होत असल्याच्या सततच्या तक्रारीनंतर अखेर महसूल प्रशासन व पोलिसांनी बंदरात कारवाई केली आहे. वैतरणा, कसराळी, खानिवडे या ठिकाणी केलेल्या कारवाईत रेती उपसा करणार्‍या बोटी चक्क जिलेटिनने उडवल्या आहेत.
पर्यावरण संतुलनासाठी रेती उपसा करण्यास कायद्याने बंदी असून न्यायालयाच्या आदेशाने तो सध्या बंद आहे. मात्र, तरीही तालुक्यात राजरोसपणे बेकायदेशीर व अनधिकृत रेतीउपसा सुरू आहे. मोठमोठ्या डोझरसह संक्शन पंपाद्वारे वसईच्या अनेक खाडीत बिनधास्तपणे चाळण सुरू आहे. रात्री अपरात्री रेती माफिया अनधिकृतपणे रेतीचे उत्खनन करतात. या रेतीमाफियांना आता महसूल प्रशासनाने दणका दिला आहे. विरार पूर्वेतील खानिवडे, कसराळी,वैतरणा खाडीवर अनधिकृत रेती उपसा करणार्‍यांवर महसूल प्रशासन व विरार पोलिसांनी बुधवारी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्वला भगत यांच्या परवानगीने रेतीमाफीयांना चांगलाच धडा शिकवला आहे, या कारवाईमुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाने वेगवेगळे पथक तयार करून विरार मधील बंदरांवर छापे टाकले,यावेळी पकडण्यात आलेल्या बोटींना चक्क जिलेटिनने उडवले आहे. अनधिकृतपणे रेती उपसा करणार्‍यांवर यापुढेही कारवाई सुरूच असेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

चौकट
रेती तस्करांविरूद कारवाया होत असल्या तरी अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.उत्खनन करणे बंधनकारक असताना रेती माफीयांकडून नदीपात्रांची चाळणी करण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. खाडीपात्रातील रेतीचे वारेमाप उत्खनन केल्याने पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते. यामुळे जैविक परिसंस्थाही धोक्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -