घरमहाराष्ट्रनाशिकआकर्षक आणि भारदस्त हॅरियरचे शानदार सोहळ्यात नाशिकमध्ये लाँचिंग

आकर्षक आणि भारदस्त हॅरियरचे शानदार सोहळ्यात नाशिकमध्ये लाँचिंग

Subscribe

एसयूव्ही श्रेणीत टाटा मोटर्सकडून ग्राहकांसाठी खास पर्याय

टाटा मोटर्सच्या ताफ्यातील बहुप्रतिक्षित ‘हॅरिअर’चे नाशिकमधील स्टर्लिंग मोटर्स येथे गुरुवार, २४ जानेवारीला दिमाखदार सोहळ्यात लाँचिंग झाले. आकर्षक आणि भारदस्त लूकमुळे हॅरिअरच्या माध्यमातून एसयूव्हीच्या श्रेणीत टाटा मोटर्सने ग्राहकांना दमदार पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

भारताच्या वाहन क्षेत्रात ‘ओमेगा एआरसी’ या नव्या आणि सर्वोच्च दर्जाची सुरक्षा वैशिष्टय़े असलेल्या संकल्पनेवर आधारीत हॅरिअरमध्ये देखणेपणापासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्वच बाबींचा अंतर्भाव असल्याची माहिती कंपनीच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष मयंक पारीक यांनी दिली. गेल्या वर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये या एसयूव्ही श्रेणीतील गाडीचे सादरीकरण करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या प्रकारांतील या गाडीची किंमत १२.६९ लाखांपासून सुरू होते. ही कार थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट अशा पाच रंगसंगतीत उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे चालकाची पसंती व वापरानुसार सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशा तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध आहे. हॅरिअर ही टाटांच्या आतापर्यंतच्या महागडय़ा गाड्यांपैकी एक असली तरीही या गाडीला ग्राहक चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हॅरियरची खासियत आणि सुविधा…

  • गाडीच्या सर्व मॉडेलमध्ये दोन, तर टॉप मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्स
  • एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑफरोड एबीएस
  • ४२५ लिटर बूटस्पेस
  • दोन लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन, सहा स्पीडचा मॅन्युअल गिअर बॉक्स
  • वेग हवा असल्यास स्पोर्ट्स मोडचा पर्याय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -