घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली प्रसूती; रिक्षातच गोंडस मुलीचा जन्म

जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली प्रसूती; रिक्षातच गोंडस मुलीचा जन्म

Subscribe

नाशिक : प्रसुतीवेदना असह्य झाल्याने गर्भवती महिलेने जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशदारासमोर रिक्षामध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. ही घटना गुरुवारी (दि.१७) सायंकाळी सहा वाजेदरम्यान घडली. वनिता मनीष वाकडे असे प्रसुती झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासह नवजात मुलीचा प्रकृती चांगली असल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

जेलरोड परिसरातील वनिताला गुरुवारी (दि.१७) सायंकाळी ५ वाजेदरम्यान प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही बाब तिच्या कुटुंबियांना समजली. त्यांनी तिला तात्काळ रिक्षाने जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. तिला कुटुंबिय रिक्षाने जेल रोड परिसरातून घेऊन निघाले. मात्र, जेलरोड ते जिल्हा रुग्णालय प्रवासादरम्यान त्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सायंकाळी ६ वाजेदरम्यान रिक्षा जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर आली. त्यावेळी तिला प्रसुतीवेदना असह्य झाल्या होत्या. तिने रिक्षामध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. ही बाब जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांना समजताच त्यांनी तिला उपचारार्थ दाखल केले. नवजात मुलीसह तिच्या आईची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -