घरताज्या घडामोडीनाशकातील मनसे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने रवाना; राहुल गांधींचा करणार निषेध

नाशकातील मनसे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने रवाना; राहुल गांधींचा करणार निषेध

Subscribe

नाशिक : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अपमानाजनक वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा, शिंदे गट यांच्यासह मनसेही गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. मागील दोन दिवसापासून राज्यभरात राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध नोंदवला जातोय. नाशकातही बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) तसेच भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दी.१७) गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आज सकाळी देखील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जन्मस्थळी भाजपा शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रित रित्या राहुल गांधीच्या विरोधात निदर्शने केली. दुसर्‍या बाजूला राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे नाशकातील मनसे कार्यकर्ते थेट शेगाव येथे राहुल गांधींच्या सभेच्या दिशेने रवाना झाले आहेत.

राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज ठाकरे यांनी संतप्त होत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुरुवारी (दी.१७) मुंबई ठाण्यातून अनेक कार्यकर्त्यांचा जथ्था नाशकात दाखल झाला. नाशिक मधील २००हून अधिक कार्यकर्ते त्यांच्या सोबत सामील झाले आहेत. रात्रीच त्यांनी शेगावच्या दिशेने कूच केली आहे. पुढे मराठवाडा आणि विदर्भातीलही कार्यकर्ते त्यांच्यासोबत सामील होणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मूर्तडक, उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले, प्रवक्ते पराग शिंत्रे आदींच्या नेतृत्वात नाशिक मधून हे २०० कार्यकर्ते राहुल गांधी यांचा निषेध नोंदवण्यासाठी रवाना झाले आहेत.

नाशिक हे सावरकरांच जन्मस्थळ आहे, इथल्या मातीत सावरकरांचे ज्वलंत विचार आहेत. आणि सावरकरांचे ज्वलंत विचारांची धग काय असते हे आम्ही राहुल गांधींना दाखवून देऊ, राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शीरसावंध्य आहे सभा आम्ही उधळणारच : अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसे नाशिक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -