घरमहाराष्ट्रनाशिकचक्क! धावता ट्रक फसला खड्ड्यात

चक्क! धावता ट्रक फसला खड्ड्यात

Subscribe

सातपूर : जुन्या नाशिकमधील ट्रक खचल्याची घटना ताजी असतानाच सातपूर औद्योगिक वसाहतीतही अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. या घटनेत रस्ता खचून धावत्या मालवाहू ट्रकचे चाक अचानक जमिनीत गेल्याने ट्रकचालक किरकोळ जखमी झाले. यानिमित्ताने महापालिकेच्या कामांचे पितळ पुन्हा एकदा उघड झाले.

सातपूर एमआयडीसी ते कॅनलरोड रस्त्यावर सदगुरु नगरजवळ सोमवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजेदरम्यान ही घटना घडली. सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक या रस्त्यावरुन औद्योगिक वसाहतीच्या दिशेने जात होता. या रस्त्यावर खड्ड्यांचा पाऊस पडलेला असतानाही दुरुस्तीकडे महापालिका अधिकार्‍यांची डोळेझाक सुरू आहे. त्यातूनच ही घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह अ‍ॅड. महेंद्र शिंदे यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

- Advertisement -
आयुक्तांची डोळेझाक?

सातपूर विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्याचा देखावा केला जातो. वास्तव मात्र वेगळेच असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या मनमानीला आयुक्तांनी चाप लावण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -