घरमहाराष्ट्रनाशिकचारापाण्याअभावी बागलाणला तीन जनावरे दगावली

चारापाण्याअभावी बागलाणला तीन जनावरे दगावली

Subscribe

जाचक अटीमुळे छावणी सुरू करण्याबाबत उदासिनता

बागलाण तालुक्यात यंदा प्रचंड दुष्काळ असून याची झळ सर्वात जास्त मुक्या जनावरांना बसली आहे. चारा- पाणी उपलब्ध न झाल्यामुळे अंबासन येथील खेमराज कोर यांच्या खासगी गोशाळेतील तीन गायींचा मृत्यू पडल्याची घटना नुकतीच घडली.

गोहत्या बंदी कायद्यामुळे भाकड जनावरे बाजारात विक्री होत नाहीत. ही जनावरे पोसण्याचा जटील प्रश्न शेतकर्‍यांपुढे आहे. चाराच शिल्लक नसल्यामुळे अनेक पशुपालकांनी जनावरे मोकाट सोडल्याचे दिसून येते. शासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कृती मात्र, दिशाभूल करणारी आहे. चारा छावणी सुरू करण्यासाठी छावणी धारकास किमान 10 लाख रूपये बँकेत डिपॉजीट ठेवण्याची जाचक अट असल्यामुळे बागलाण तालुक्यात तीव्र चारा टंचाई असून सुद्धा कोणीही छावणी सुरू करत नसल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिस खान व मंडळ अधिकारी सी. पी. अहिरे यांनी दिली. जून संपल्यानंतरही बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे जनावरे सांभाळण्याचा प्रश्न अवघड झाला आहे. मेंढपाळ बांधव प्रचंड हैराण झाले आहेत . सर्वच पशुपालक कमालीचे धास्तावले आहेत. चारा छावणीच्या जाचक अटी नियम रद्द करून मागेल त्याला चारा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार दीपिका चव्हाण, पशुपालक खेमराज कोर, बाजीराव सावंत, आण्णासाहेब सावंत, डॉ. शेषराव पाटील, राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांनी केले आहे.

- Advertisement -

 

बागलाण तालुक्यात 1972 पेक्षा जास्त भयाण दुष्काळ आहे. चारा छावणीच्या जाचक अटी रद्द करून गावागावात चारा डेपोसाठी विधिमंडळात आवाज उठवण्यात येईल.

- Advertisement -

-दीपिका चव्हाण; आमदार

येत्या 8 दिवसात जर चारा उपलब्ध करून दिला नाही तर जनांवराना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल .

– राजाराम पाटील, पशुपालक काकडगाव

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -