घरताज्या घडामोडीआरोग्य विभागातील तीन परिचरांनी नियुक्ती नाकारली

आरोग्य विभागातील तीन परिचरांनी नियुक्ती नाकारली

Subscribe

अकरा जणांची समुपदेशनाद्वारे नियुक्ती; जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाची कारवाई

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेतील सहायक प्रशासन अधिकारी व अनुकंपावरील परिचरांच्या तात्पुरत्या नियुक्त्या सामान्य प्रशासन विभागाने मार्गी लावल्या आहेत. मात्र, तीन परिचरांनी नियुक्ती नाकारली असून, उर्वरीत अकरा जणांनी हजर होण्याची तयारी दर्शवली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून राजेश जाधव तर, त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील प्रकाश थेटे यांची आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. देवळा पंचायत समिती व बागलाण पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासन अधिकारीपदी अनुक्रमे नाना पवार व अनिल गिते यांची नियुक्ती झाली आहे. अनुकंपा तत्वावरी तात्पुरत्या स्वरुपात परिचरांना आरोग्य सेवकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. 14 पात्र परिचर कर्मचार्‍यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र यातील तीन परिचरांनी नियुक्ती नाकारली आहे. उर्वरित 11 परचिरांचे पदोन्नती आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये सदानंद जिभाऊ आहिरे (ता. देवळा), प्रतिक मुकुंद सोनवणे (ता. नाशिक), मनोज डोंगेळ (ता. बागलाण), महेंद्र सुर्यवंशी (ता. सिन्नर), ज्ञानेश्वर कानडे (ता.चांदवड), देविदास दौंड (ता. दिंडोरी), प्रशांत जाधव (ता. कळवण), सचिन बागुल (ता. दिंडोरी), सागर वाघले (ता.कळवण), पिंडू उत्तम अहिरे (ता. बागलाण), युवराज सोनवणे (ता. बागलाण), जगदिश वाघमारे (ता. सुरगाणा) येथे नियुक्ती दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांच्या उपस्थितीत कनिष्ट प्रशासन अधिकारी महेंद्र पवार, रणजीत पगार, गणेश बगड, किशोर पवार, मंगशे केदारे यांनी ही कार्यवाही केली.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -