घरमहाराष्ट्रनाशिकसामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलीस निलंबित

सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलीस निलंबित

Subscribe

नाशिक बलात्कारप्रकरणी रात्रपाळीच्या गस्तीपथकात असलेल्या पंचवटी ठाण्याच्या दोन पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

नाशिक बलात्कारप्रकरणी रात्रपाळीच्या गस्तीपथकात असलेल्या पंचवटी ठाण्याच्या दोन पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

कारभारी काकुळते व गोरख रेहरे, असे निलंबित झालेल्यांची नावे आहेत. रविवारी (ता.३१) रात्री संशयित रिक्षाचालक बाळू तायडे, दिगंबर कुंदे यांनी २२ वर्षीय विवाहितेला रिक्षात बळजबरीने बसवून शरदचंद्र पवार मार्केटयार्डमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा मखमलाबाद परिसरात बलात्कार केला. त्यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे गस्तीवरील नाईक कारभारी काकुळते व गोरख रेहरे यांनी संशयित रिक्षा चालकाला पकडले. मात्र, संशयिताने पत्नी असल्याचे सांगत चिरीमिरी करत सुटका करून घेतली. दुसर्‍या दिवशी चिरीमिरीची घटना उघडकीस आली. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात पैसे घेणार्‍या पोलिसांची पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी चौकशी करून पोलीस आयुक्तांकडे अहवाल सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -