घरमहाराष्ट्रनाशिक‘मविप्र’तर्फे उद्यापासून ‘युपीएससी शिक्षणाची वारी’

‘मविप्र’तर्फे उद्यापासून ‘युपीएससी शिक्षणाची वारी’

Subscribe

मविप्र संस्थेच्या चार महाविद्यालयांमध्ये पोहोचणार वारी

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा ओढा स्पर्धा परीक्षांकडे वाढत असल्याने मविप्र संस्थेच्या वतीने ’वारी युपीएससीची’ अंतर्गत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील युपीएससी उत्तीर्ण उमेदवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

’वारी युपीएससीची’ हा उपक्रम यंदा मविप्र संस्थेच्या चार महाविद्यालयांमध्ये पोहोचणार असून यात गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव येथे, दुपारी २.३० वाजता कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय सटाणा येथे शुक्रवार (दि.2)रोजी सकाळी १०.३० वाजता जी. एम. डी. आर्ट्स व बी. डब्ल्यू कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय सिन्नर येथे तर शनिवार (दि.३) रोजी सकाळी १० वाजता केटीएचएम महाविद्यालय (रावसाहेब थोरात हॉल)येथे होणार आहे.

- Advertisement -

२०१७ मध्ये सहा राज्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम यावर्षी १० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. २०१७ मध्ये अधिकारी झालेले योगेश भरसट व आदित्य रत्नपारखी यांनी २०१८ मध्ये तेजस पवार यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये ’वारी युपीएससीची’ अंतर्गत आयएएस नवजीवन पवार मविप्रच्या पिंपळगाव, सटाणा, सिन्नर व केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार व शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर काजळे यांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -