घरमुंबईआता धनगर समाजाला मिळणार आदिवासींच्या सवलती

आता धनगर समाजाला मिळणार आदिवासींच्या सवलती

Subscribe

एसटी समाजाच्या २२ योजना धनगर समाजाला लागू होणार असल्याचा निर्णय फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना आता राज्य सरकारकडून सर्वच स्तरातील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी मराठा समाजाला आरक्षण देऊन खूश केल्यानंतर आता राज्य सरकारने धनगर समाजाला देखील खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास होणारा विलंब पाहता आता राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती मिळणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी समाजाच्या २२ योजना धनगर समाजाला लागू होणार असल्याचा निर्णय फडणवीस सरकारने आज, मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे.

आज राज्य मंत्रीमंडळाने आदिवासी विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज बांधवांसाठी विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -
  1. भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गासाठी भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे
  2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे
  3. भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे
  4. भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुलं बांधून देणे
  5. भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी नसलेल्या योजना राबवण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना
  6. राज्यातील भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे
  7. केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे
  8. भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसळ्यात चराईकरता जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांसाठी चराई अनुदान देणे
  9. भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण
  10. भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक सवलती लागू करणे
  11. भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे
  12. ग्रामीण भागातील कुक्कुटपालन संकल्पेनर्गत भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी आणि संगोपनासाठी अर्थसहाय्य
  13. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यलायाच्या ठिकाणी भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे

मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय

1. बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना

2. आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना विशेष कार्यक्रमांतर्गत धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय

- Advertisement -

3. पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यास पाणी वळविण्यासाठी नदीजोड योजनेस राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यास तत्त्वत: मान्यता देण्यासह सर्वेक्षण करण्यास मान्यता

4. मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोष‍ित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोष‍ित करण्यास मान्यता.

5. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता.

6. महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमार्फत नागरी स्थान‍िक स्वराज्य संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता

7. इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR) संस्थेच्या स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथील २० एकर जागा नाममात्र दराने देण्यास मान्यता

8. सुपर ३० या हिंदी चित्रपटास जीएसटी कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा करातून परतावा देण्याबाबत

9. नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी १० कोटी मंजूर

10. पर्यटन विकास व देखभालीसाठी एमटीडीसीला देण्यात आलेल्या अंबाझरी येथील ४४ एकर शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत ९९ वर्षे करण्यास मान्यता

11. राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या परिरक्षेचे धोरण मंजूर

12. दगड या गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या दरवाढीपैकी स्थगित केलेल्या दरवाढीच्या रक्कमेसंदर्भात निर्णय

हेही वाचा –

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लावली – जितेंद्र आव्हाड

आता काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटत नाही – शिवेंद्रराजे भोसले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -