घरमहाराष्ट्रनाशिकऐन दिवाळीत पाथर्डी गावात पाण्याचा दुष्काळ

ऐन दिवाळीत पाथर्डी गावात पाण्याचा दुष्काळ

Subscribe

नाशिक : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातलेला असताना नाशिक महापालिका क्षेत्रातील पाथर्डी गावासह परिसरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना टँकरने पाणी मागवण्याची वेळ आली आहे. गावठाण भागात सकाळी नळांना पाणी येते. मात्र, अत्यंत कमी दाबाने व फक्त अर्धा तास पाणी येत असल्याने पाण्याचा साठाही करता येत नाही. मागील आठवड्यापासून पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. दिवाळी सणाच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे टँकरने पाणी मागवावे लागत आहे. पाणी पुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळेच ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर व मुकणे धरणात यंदा मुबलक पाणीसाठी उपलब्ध असताना दुसरीकडे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पाथर्डीकरांना ऐन दिवाळीत पाण्यासाठी भटकंती करावा लागत आहे. पाथर्डी परिसरात मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पाथर्डी फाटा व नव्याने विकसित होत असलेल्या भागात नियमित पाणी पुरवठा होत असला तरी गावठाणामध्ये अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिला वर्गाची मोठी अडचण होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ऐन दिवाळीच्या काळात पाणीपुरवठा कमी होत असल्याने नागरीकांना पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. स्वच्छतेसाठी सुध्दा पाणी पुरत नसल्याने महापालिकेने याची गंभीर दखल घ्यावी. अन्यथा आम्ही यासाठी आंदोलन करणार आहोत. : चेतन कोथमिरे, सामाजिक कार्यकर्ते, पाथर्डी गाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -