घरमहाराष्ट्रनाशिकचणकापूर पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी?

चणकापूर पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी?

Subscribe

दोन वर्षांपूर्वी कोसळला, अद्यापही दुरुस्ती नाही

कळवण तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन चणकापूर धरणाजवळ असलेल्या पुलाचा दोन वर्षांपूर्वी कोसळलेला काही भाग ‘जैसे थे’च असून दोन वर्षांपूर्वी पूल कोसळून अद्यापही दुरुस्ती न झाल्याने या कामाला मुहूर्त लागणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.

चणकापूर धरणासमोर असलेल्या नदीवर कनाशीकडे जाणार्‍या रस्त्यावर हा पूल आहे. २०१३ म्हणजेच अवघ्या सात वर्षापूर्वी या पुलाचे काम झाले. सहा वर्षातच पुलाचा एक भाग ढासळल्याने निकृष्ट कामाचे कळवण तालुक्यातील आणखी एक उदाहरण समोर आले होते. या मार्गाचा वापर परिसरातील शेतकरी, नागरिक आणि येथे येणारे पर्यटक करत असतात. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात ह्या पुलाची मोडतोड झाली. दोन वर्षे होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाकडे ढुंकूनही बघितले नसल्याने या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. या पुलाचा वापर करणार्‍या नागरिक आणि पर्यटकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत असून अपघाताची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांसह शेतकरी व पर्यटकांनी केली आहे.

निकृष्ट कामांना अभय!

चणकापूरजवळील हा पूल कोसळून दोन वर्षे होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी केली का आणि केली असेल तर त्यावर काय कार्यवाही केली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील निकृष्ट कामांना सा.बां.चे अभय आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कळवण तालुक्यात टक्केवारीत कारभार गुरफटल्याने शासकीय कामे दर्जाहीन होत असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -