घरमनोरंजनलोकांचा मसीहा ठरलेला सोनू सुद आहे कोट्यवधींचा मालक,वाचून चकित व्हाल!

लोकांचा मसीहा ठरलेला सोनू सुद आहे कोट्यवधींचा मालक,वाचून चकित व्हाल!

Subscribe

मदतीसाठी कधीच माघार घेतली नाही आजही सोनू राहत असलेल्या ठिकाणी लोक त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येत आहेत.

कोरोना विषाणूचा कहर थांबायचं नाव घेत नाही आहे. कोरोना वॉरियर्स कोरोनाशी झुंज देत असताना, देशामध्ये अधिक बिकट परिस्थितीचा सामना लोकांना करावा लागत आहे. अशातच लोकांचा मसीहा बनलेला सोनू सुद गेल्या वर्षभरापसून अहोरात्र लोकांच्या सेवेसाठी झटत आहे. सोनू सुदच्या कामगिरीच कौतुक सर्व स्तरावरून करण्यात येत आहे. सोनूने स्व:खर्चातून अनेक स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवले इतकेच नाही तर कोरोनाकाळात अडकलेल्या अनेकांना त्याने मदतीचा हात दिला. लोकची एवढी भरभरून सेवा करणार्‍या सोनू सुद कडे नेमकं  आर्थिकबळ येतं तरी कुठून? याची माहिती मिळाली आहे. लोकांसाठी दैवत बनलेला सोनू सुद कोट्यवादी रूपयांचा मालक आहे.

caknowledge.com नुसार सोनू सूद एकूण 130 कोटींची संपत्तीचा मालक आहे. तसेच ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे.सोनू गेल्या 2 दशकभरापासुन बॉलिवूड सिनेमा मध्ये काम करत आहे. त्याने अनेक सुपरस्टार सोबत स्क्रीन शेअर केलीये. सोनू त्याच्या पत्नी आणि मुलासोबत मुंबई मध्ये राहतो. 1996 मध्ये सोनू नागपुरात शिकत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. सोनू सूदला इशांत आणि अयान अशी दोन मुले आहेत.
सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला या उच्चभ्रू भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे घर 4 बीएचके इतके आहे. यासोबतच सोनूचे मुंबईत सारख्या महागड्या शहरात आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात. सोनू सूद गाड्यांचाही शौकीन आहे त्याच्याकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत तब्बल 66 लाख रुपये इतकी आहे. तसेच त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा सारखी लक्झरि कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे.

- Advertisement -

आज सोनू सुदच्या दिलदारीने अनेक लोकांचे प्राण वाचवले. कोरोना व्हायरस भारतात
आल्यापासून त्याचा मदतीचा ओघ सुरूच आहे. त्याने मदतीसाठी कधीच माघार घेतली नाही आजही सोनू राहत असलेल्या ठिकाणी लोक त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येत आहेत.


हे हि वाचा – सकारत्मक राहून करा कोरोनावर मात…डॉक्टर असलेल्या अभिनेत्याची नागरिकांना साद

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -