घरमहाराष्ट्रनाशिककाँगेस सोडून काही लोक भाजपमध्ये का गेले

काँगेस सोडून काही लोक भाजपमध्ये का गेले

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळांचा राणेंवर प्रहार

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून महाविकास आघाडीला विशेषतः मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे भुजबळांप्रमाणेच मातोश्रीचे गुन्हे आहेत. भुजबळ आत गेले. मातोश्रीचीही रसद वरती पोहोचवल्याचे सांगितले. या आरोपांना नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान टोलेबाजी करत आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीमुळे आनंदाचे वातावरण आहे. आज पत्रकार परिषद झाली नसती, तर बरं झालं असतं. मात्र, असो म्हणत त्यांनी काँग्रेस सोडून काही लोक भाजपमध्ये का गेले? पब्लिक सब जानती है, म्हणत नारायण राणे यांच्यावर प्रहार केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भुजबळांचे नाव घेत मातोश्रीवर टिका केली. भुजबळांसारखेच मातोश्रींवर आरोप आहेत. भुजबळ आत गेले अडीच वर्ष. तसेच गुन्हे मातोश्रीचे आहेत. त्याची माहिती मी पोहोचती केल्याचे सांगितले. दोघांचाही सीए एकच आहे, असा दावा केला होता.

- Advertisement -

राणे यांच्या आरोपाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. पत्रकार परिषद झाली नसती तर बरे झाले असते. आज तशी परिस्थिती नाही. त्यांचे आणि माझे सीए वेगळे आहेत. त्यांच्या सीएचा आमच्या सीएशी संबंध नाही. आजकाल कारवाई करताना मटेरिअल महत्वाचे नसते. दिल्लीवरून आदेश आला की, नसलं तरी कारवाई होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आपल्या पक्षात येणार म्हटल्यावर, इनको छोड दो असा उलटा संदेश येतो, असा दावाही यावेळी भुजबळांनी केला.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -