घरमहाराष्ट्रनाशिकट्रकच्या धडकेत महिला ठार

ट्रकच्या धडकेत महिला ठार

Subscribe

दिंडोरीरोड वरील घटना

मायलेक दुचाकीवरुन नाशिककडून दिंडोरीकडे जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत आई जागीच ठार झाली. तर दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२३) दुपारी दिंडोरी रोडवर रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सुनंदा दीपक सोनवणे (४५, रा. नमो गुरूदेव सोसायटी, राऊ हॉटेलजवळ, पेठरोड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. राकेश दीपक सोनवणे (२७) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. दीपक सोनवणे हा आई सुनंदा यांना दुचाकी (एम. एच.15 टी 3972)वरुन शुक्रवारी दुपारी दिंडोरीवरुन जात होता. रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दुचाकी आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (एम.एच.15 ईजी 6515)ने दुचाकीला जोरदार धडकी दिली. या अपघातात सुनंदा सोनवणे यांचा जागीच ठार झाल्या तर राकेश किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -