घरमहाराष्ट्रनाशिकमिनी मंत्रालयावर कारभारणींची छाप

मिनी मंत्रालयावर कारभारणींची छाप

Subscribe

कौटुंबिक जबाबदारी आणि राजकारण यात नैपुण्य मिळवत आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण करण्यार्‍या महिलांमध्ये जिल्हा परिषदेने आपले स्थान निर्माण केले आहे. मंत्रालयाचे प्रवेशद्वार अर्थात जिल्हा परिषदेत सध्या महिला राज कार्यरत आहे. सहा पदाधिकार्‍यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पाच महत्वाची सत्तापदे त्यांच्या हाती एकवटली आहेत.

कौटुंबिक जबाबदारी आणि राजकारण यात नैपुण्य मिळवत आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण करण्यार्‍या महिलांमध्ये जिल्हा परिषदेने आपले स्थान निर्माण केले आहे. मंत्रालयाचे प्रवेशद्वार अर्थात जिल्हा परिषदेत सध्या महिला राज कार्यरत आहे. सहा पदाधिकार्‍यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पाच महत्वाची सत्तापदे त्यांच्या हाती एकवटली आहेत. आयुष्यात पहिल्यांदा सदस्य होण्याचा बहुमान मिळालेल्या या महिलांनी आपला प्रपंचाचा गाडा व्यवस्थितरित्या सांभाळत ‘बॅलन्स फॉर बेटर’ याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले.

१ मे १९६२ ला स्थापन झालेल्या जिल्हा परिषदेत ७३ सदस्यांपैकी ३७ महिला सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष झाला. बहुमत नसल्यामुळे शिवसेना व काँग्रेसने एकत्र येत अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवले. तर सभापतींच्या निवडणुकीत फुटीर काँग्रेसला सोबत घेऊन भाजप, राष्ट्रवादीने बाजी मारली. यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष शीलत सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, समाजकल्याण सभापती सुनिता चारोसकर या पाच महिलांच्या हातात ग्रामविकासाचा गाडा आहे. सत्तास्थापनेपूर्वी घडलेले नाराजीनाट्य विसरून महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. संयमी व शांत स्वभावाच्या अध्यक्षांनी दोन वर्षात समस्या निराकरणावर यशस्वी तोडगा काढला.

- Advertisement -

सभागृहात निर्माण झालेला तिढा सभागृहाबाहेर सोडवून दाखवण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच प्रत्येक सदस्याला त्याचे म्हणणे मांडू देण्याची संधी द्यायची आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते. उपाध्यक्ष नयना गावित यांचा सासर व माहेरची जबाबदारी सांभाळण्यात जास्त वेळ व्यतित होत असल्यामुळे मिनी मंत्रालयाकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. त्यांनी ही उणीव सभांमध्ये भरून काढत आक्रमक कार्यशैली अंगीकारली आहे. तसेच अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांना दोन अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळाली. मिनी मंत्रालयाचे अंदाजपत्रक सादर करताना आवश्यक बाबींसाठी अधिक निधी देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसेच राज्यात सत्ता असलेल्या भाजपकडून पाणी पुरवठा योजनांसाठी त्यांनी सतत पाठपुरावा केल्याचे दिसून आले. या महिलांच्या तुलनेत महिला, बालकल्याण व समाजकल्याण विभागाला निधीसाठी फारसे झगडावे लागले नाही.

येत्या काळात आपल्या कर्तुत्वाची नवी ओळख निर्माण होईल, यासाठी अविरत धडपड त्यांना करावी लागेल. मिनी मंत्रालयाचा कारभार समजून घेण्यात गेलेला वेळ भरून काढण्यासाठी दोन वर्षाच्या अनुभवाची शिदोरी या महिलांनी जमवली आहे. केवळ कौटुंबिक जबाबदार्‍यांपर्यंत मर्यादित असणार्‍या या स्त्रियांना मिनी मंत्रालयाने सक्षमपणे जगण्याचे आणि कर्तुत्वसिद्धतेचा नवा सन्मार्ग दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -