घरमहाराष्ट्रनाशिकजि.प. कर्मचारी पतसंस्थेत परिवर्तन; सहकार पॅनलचा एकतर्फी विजय

जि.प. कर्मचारी पतसंस्थेत परिवर्तन; सहकार पॅनलचा एकतर्फी विजय

Subscribe

नाशिक : संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने एकहाती बाजी मारत सत्ता मिळवली. ‘आपला पॅनल’सह अपक्ष उमेदवारांना खातेही उघडता आले नाही.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची अर्थवाहिनी संबोधण्यात येणार्‍या या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार (दि.6) रोजी मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये मतदान झाले. 15 जागांसाठी एकूण 1468 मतदारांपैकी 1150 म्हणजेच (78 टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी 5 वाजेला याच हायस्कूलच्या कै. डॉ. वसंतराव पवार सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला. चार टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलेली होती. पहिल्या फेरीपासूनच मतदारांचा कौल लक्षात येण्यास सुरुवात झाली आणि सहकार पॅनलची विजयाकडे घोडदौड सुरू झाली. सायंकाळी 8 वाजेला सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी घोषित केले. सहकार पॅनलचा विजय दिसताच आपला पॅनलच्या उमेदवारांसह नेत्यांनी मतमोजणी केंद्रावरुन काढता पाय घेतला. सहकार पॅनलच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. यावेळी सहकार पॅनलचे नेते रवींद्र थेटे, रवींद्र आधळे, प्रमोद निरगुडे, किरण निकम, अनिल ससाणे, शशांक मदने यांच्यासह उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

यांनी मारली बाजी 

सर्वसाधारण गट
सचिन आत्रे, अमित आडके, रवींद्र थेटे, रंजन थोरमिसे, नितीन पवार, चंद्रशेखर पाटील, सचिन पाटील

तालुका प्रतिनिधी 
किशोर अहिरे, गणेश गायकवाड, नंदकिशोर सोनवणे

- Advertisement -

राखीव गट 
विक्रम पिंगळे (ओबीसी), अनिल दराडे (एनटी), मंगेश जगताप (एससी,एसटी)

महिला गट 
अर्चना गांगोडे, सरिता पानसरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -