घरमहाराष्ट्रनाशिकघरे फ्री-होल्ड होईपर्यंत सिडको कार्यालय सुरू

घरे फ्री-होल्ड होईपर्यंत सिडको कार्यालय सुरू

Subscribe

नवीन नाशिक : सिडकोने ‘लीज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून मालमत्ताधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरू ठेवावे, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. रविवारी (दि.६) वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तिदमे यांनी यासंदर्भातील निवेदने दिले. याबाबत, मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मकता दाखवली असून लवकरच निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे तिदमे यांनी सांगितले.

नवीन नाशिक येथे सिडकोने सदनिकाधारकांना ९९ वर्षे कराराने २५ हजार घरे विकली असून, अंदाजे ५ हजार वेगवेगळ्या वापरांचे भूखंड वाटप केलेले आहेत. तसेच, वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे १५०० टपरी भूखंडही दिलेले आहेत. सिडकोने ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी, अशी सिडकोवासियांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. छोट्या-छोट्या घरांत राहणार्‍या सिडकोवासियांचा कुटुंब विस्तार वाढल्याने घराचाही विस्तार वाढवावा लागतो. वाढीव बांधकाम करताना या कामगार व अल्पउत्पन्न गटातील घरधारकांना कर्ज काढावे लागते. मात्र, लिज होल्ड मालमत्ता असल्याने अनेक बँका कर्ज देत नाहीत. काही वित्त संस्था याचा लाभ उठवत जास्त व्याजदराने कर्ज देऊन पिळवणूक करतात.

- Advertisement -

लिज होल्डऐवजी ‘फ्री होल्ड’ मालमत्ता झाल्यास घरधारकाला घराचा पुनर्विकास करणे सुलभ होईल. तसेच, फ्री होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सिडको प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना सचिव संजय माशेलकर, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लक्ष्मी ताठे, महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना जिल्हा प्रमुख योगेश म्हस्के, सदानंद नवले, अ‍ॅड. श्रद्धा जोशी व शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -