घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या डॉ. नमिता कोहक यांची अंतराष्ट्रीय भरारी

नाशिकच्या डॉ. नमिता कोहक यांची अंतराष्ट्रीय भरारी

Subscribe

नाशिक : नाशिकच्या डॉ. नमिता कोहोक यांना अमेरिकेत ‘मिसेस ग्लोबल युनाइटेड एलिट लाइफटाईम क्वीन’चा किताब प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कोहोक यांच्या माध्यमातून भारताचे नाव पुन्हा एकदा अमेरिकेत उंचावले आहे. ग्लोबल युनायटेड पेजंटशी त्या पाच वर्षांपासून जोडलेल्या आहेत. ग्लोबल युनायटेड 2017, मिसेस ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन-2018 पासून आतापर्यंत त्या कामकाज बघत होत्या.

दरवर्षी जुलै महिन्यामध्ये ग्लोबल युनाइटेड पेजंट असते. 48 हुन अधिक देशांमधून कॅन्सर सर्वायवर स्पर्धक येतात. एक आठवडा वेगवेगळे राऊंड्स होतात. ही स्पर्धा कॅन्सर सर्वायवर्ससाठी भरवली जाते. नमिता कोहोक या पहिल्या भारतीय आहेत ज्यांना हा किताब मिळाला आहे. अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत 23 देशातील 97 शॉर्ट लिस्टेड क्वीन्स स्पर्धेसाठी होत्या. यात सर्वात जास्त मते कोहोक यांना मिळाल्याने त्यांना विजेत्या घोषित करण्यात आले. कुठलीही सौंदर्य स्पर्धा म्हटली की, विजेत्यांना एका वर्षासाठीच तो मुकूट प्रदान केला जातो. पण ग्लोबल युनायटेड यांचा पायाच सर्व कॅन्सरवर मात करून जगासमोर उदाहरण ठेऊन काम करणार्‍या महिला आहेत. कोहोक या 5 वर्षात 4 आंतरराष्ट्रीय किताबाच्या मानकरी ठरल्या आहेत.

- Advertisement -

कोहक यांच्या कार्याचा गौरव

कॅन्सर रुग्णांसाठीचे काम, सकारात्मक विचारांवरची व्याख्याने, गरजू रुग्णांसाठी विशेषत: छोट्या मुलांच्या केमोथेरेपीसाठी निधी जमा करणे, रुग्णांचे समुपदेशन करणे यामुळे कोहोक या अमेरिकेत ग्लोबल युनाइटेड प्रोग्रॉममध्ये खूपच आवडत्या आहेत. त्यांना विंडी हौगर, ईल्लेणा व डेनियल या ग्लोबल युनाइटेड पेजन्टच्या नॅशनल डायरेक्टर्सने किताब बहाल केला.

निष्ठा, चिकाटी, अपार मेहनत, परिवाराची साथ यामुळेच आज अमेरिकेतल्या ग्लोबल युनाइटेडच्या सर्वात मोठ्या पदाची मानकरी ठरली आहे. जीवनात ठरवलं तर काहीच अशक्य नाही. माझे गुरू व परिवारामुळे मी यशस्वी ठरले. : डॉ. नमिता कोहोक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -