घरदेश-विदेशदेशातील ज्वलंत प्रश्नांविरोधात उद्या काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन; राजभवनालाही घालणार घेराव

देशातील ज्वलंत प्रश्नांविरोधात उद्या काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन; राजभवनालाही घालणार घेराव

Subscribe

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात उद्या शुक्रवारी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले म्हणाले.

देशात सद्य स्थितीत ज्या काही घडामोडी घडत आहेत. किंवा केंद्र सरकार(central govt) सर्व नेत्यांमागे ईडीची कारवाई लावत आहे. असे आरोप विरोधी पक्ष्यांकडून केंद्र सरकारवर केले जात आहेत. केंद्रा मध्ये असलेलं भाजपा(bjp) सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब देशात उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही अतिरिक्त जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहेत. देशात बेरोजगारीचा उच्चांक झाला असून देशातील तरुणांनाचे भवितव्य अंधारात आले आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. आणि त्याच्याच निषेधार्थ काँग्रेस(congress) कडून उद्या शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार असून त्यानंतर जेलभरो करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी दिली आहे.

हे ही वाचा – ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, नाना पटोलेंची मागणी

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने(modi sarkar) जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’(agnipath) नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस(congress) पक्षाची मागणी आहे.

nana patole

- Advertisement -

हे ही वाचा –  नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी संसदेत गोंधळ होण्याची शक्यता; काँग्रेसने बोलावली तातडीची बैठक

त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील(marathvada) शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकासान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार
महाराष्ट्राचा व महापुरुषांचा अवमान करत असतात. नुकतं राज्यपालांनी मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते वक्तव्य करून राज्यपालांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असून त्यांच्या बोलण्यातून भाजपा व आरएससची शिकवणच नेहमी दिसून येते.

हे ही वाचा – Nana Patole : नाना पटोले प्रकरणी केंद्राची एंट्री टाळण्यासाठी गृहमंत्र्यांनी अहवाल मागवला – चंद्रकांत पाटील

काँग्रेस(congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उद्या सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल व त्यानंतर जेलभरो केले जाणार आहे. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवून निषेध व्यक्त करतील.

हे ही वाचा – मोदी सरकारला जाब विचारल्याने सोनिया, राहुल गांधींची ईडीकडून चौकशी; नाना पटोलेंचा आरोप

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -