घरताज्या घडामोडीNana Patole : नाना पटोले प्रकरणी केंद्राची एंट्री टाळण्यासाठी गृहमंत्र्यांनी अहवाल मागवला...

Nana Patole : नाना पटोले प्रकरणी केंद्राची एंट्री टाळण्यासाठी गृहमंत्र्यांनी अहवाल मागवला – चंद्रकांत पाटील

Subscribe

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप गेल्या दोन दिवसांमध्ये आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. नाना पटोलेंविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यापासून ते तक्रारी, एफआयआर आणि कायदेशीर याचिका दाखल करताना भाजपचे नेते आणि कार्यकर्ते भिडले आहेत. राज्यात १०० पेक्षा जास्त ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर गृहमंत्र्यांच्या कारवाईवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नाना पटोलेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात राज्यात भाजपकडून १०० हून अधिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. तर कोर्टात जाण्यासाठी ७ दिवसांची नोटीसही देण्यात आली आहे. नाना पटोलेंविरोधात तक्रार दाखल करताना भाजपने न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी दाखवली आहे. त्यामध्ये बावनकुळेंनी कोर्टात जाण्यासाठीची नोटीसही दिली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. एफआयआरचे चार्जशीटमध्ये रूपांतर नाही झाले तर परमबीर सिंह, अनिल देशमुख यांची उदाहरणे आहेतच असेही सूचक वक्तव्य त्यांनी केली. राज्यात अशा प्रकरणांसाठी न्यायालये आहेत, काळजी करण्याचे कारण नाही, असाही टोला त्यांनी लगावला. पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. पटोले यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहील, असेही ते म्हणाले. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करताना पोलिसांनी जो न्याय लावला तोच न्याय लावून पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी भाजपाची मागणी आहे.

- Advertisement -

केंद्राची एंट्री टाळण्यासाठी चौकशी अहवाल

राज्यातील गृहमंत्र्यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्याचा चौकशी अहवाल मागवला आहे. हा चौकशी अहवाल म्हणजे या प्रकरणात केंद्राने दखल घेऊ नये म्हणून मागविण्यात आला आहे, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात रोष आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी नाना पटोलेंविरोधात आंदोलन हे कायम राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील एका सभेत प्रचारादरम्यान मोदी नावाचा उल्लेख करत मी मोदींना मारू शकतो, मोदींनी शिव्या देऊ शकतो, असे वक्तव्य केले होते.


Nagar Panchayat Election : नगरपंचायतीतही भाजपच नंबर १ ! महापालिकेतही पुरून उरणार- चंद्रकांत पाटील

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -