घरमहाराष्ट्रसमीर वानखेडेंनी जातीचा बोगस दाखला काढून IRS ची नोकरी मिळवली; मलिकांचा आरोप

समीर वानखेडेंनी जातीचा बोगस दाखला काढून IRS ची नोकरी मिळवली; मलिकांचा आरोप

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंनी जातीचा बोगस दाखला काढून आयआरएसची नोकरी मिळवली, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला शेअर केला आहे.

नवाब मलिक यांनी या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. गेले १४-१५ दिवस किरण गोसावी, मनीष भानुशाली, फ्लेचर पटेल, तसंच तीन जणांना सोडलं, मालदीवचा दौरा हे विषय काढले की समीर वानखेडे कोणतंही उत्तर ते देत नाहीत. राजकीय आरोप आहेत, व्यक्तीगत आरोप करत आहेत, असा आरोप ते करतात. पण रविवारी जो प्रभाकर साईलने खुलासा केला, त्यावरुन मी जे काही बोलत होतो ते सत्य बाहेर आलं आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

भाजपवाले हिंदू-मुस्लीम करत होते. नवाब मलिक मुस्लीम, आर्य खान मुस्लीम यावरुन हिंदू-मुस्लीम वातावरण निर्माण केलं जात होतं. वानखेडे हे समीर दाऊद वानखेडे आहेत. जन्मापासून आजपर्यंत मुस्लीम आहेत. त्यांचा जन्माचा दाखला मी प्रसिद्ध केला आहे. हा शोधायला बरेच परिश्रम करावे लागले. त्यांच्या बहिणीचा ऑनलाईन दाखवला मिळतो. त्यात के वानखेडे शब्द वापरले आहेत. दाऊद वानखेडे धर्मांतर केल्यानंतर त्यांनी नाव बदललं होतं. त्याच्या आधारे जन्माचा दाखला काढण्यात आला. नंतर त्यात खोडाखोड सुरु करण्यात आली. इथूनच वानखेडेंची बोगसगिरी सुरु झाली आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

हळूहळू बरीच कागद समोर आणणार आहे. बोगस दाखला काढून आयआरएसची नोकरी मिळवली आहे. निश्चितरुपाने बोगसगीरी केली आहे. त्यांचा हा काळा अध्याय मी जनतेसमोर आणणार, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. ७ डिसेंबर २००६ साली त्यांचं लग्न झालं. त्या दिवशी रिसेप्शन चा फोटो आहे. हा फोटो वानखेडेंची पहिली पत्नी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर उपलब्ध आहे. नोकरीसाठी बोगस दाखला काढण्यात आला. जी नवीन पत्नी आहे, त्यांच्या कंपनीमध्ये कुठल्या बिल्डरची गुंतवणूक आहे. कुठल्या माध्यमातून हवाला रॅकेटने हे पैसे पाठवतात हे हळूहळू समोर येईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – ‘समीर दाऊद वानखेडे’, जन्माचा दाखला शेअर करत नवाब मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा हल्लाबोल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -