सुभाष घई यांचा ‘विजेता’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला, सुबोध भावे मुख्य भूमिकेत

subhash ghai marathi film vijeta release on 3 december 2021 subodh bhave lead roll in this film
सुभाष घाई यांचा 'विजेता' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला, सुबोध भावे मुख्य भूमिकेत

बॉलिवूडमधील राम लखन, ताल आणि हिरो सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांनंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांचा मराठमोळा ‘विजेता’ सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मुक्ता आर्ट्स निर्मित ‘विजेता’ सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे,पुजा सावंत, प्रीतम कागणे ,सुशांत शेलार,माधव देवचक्के, मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर या कलावंतांचा समावेश आहे.

१२ मार्च २०२० रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता पण कोरोनाचा उद्रेक वाढल्याने चित्रपटाचे प्रदर्शन एकादिवसात मागे घेण्याचा निर्णय सुभाष घई यांनी घेतला. पण आता परिस्थिती पुन्हा हळू हळू पूर्व पदावर येत आहे आणि मुक्ता आर्टसने ‘विजेता’ सिनेमा पुन्हा प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचा मागील नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नसल्यामुळे, महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. सौमित्र पुढे महाराष्ट्राला जिंकवून देणं हे त्याचं ध्येय असतं. तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो . त्या सर्वां मधील हरवलेलाआत्मविश्वास कसा परत आणतो, त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला कसं शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो हे सर्व प्रेक्षकांना ‘विजेता’मधून पाहता येणार आहे. यात सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या ३ डिसेंबरपासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


67th National Film Awards : रजनीकांत ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित, धनुष, मनोज बाजपेयी, कंगनाचाही गौरव