घरताज्या घडामोडीNawab Malik: फर्जीवाडाविरुद्ध लढाई सुरुच राहणार, नवाब मलिकांनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा

Nawab Malik: फर्जीवाडाविरुद्ध लढाई सुरुच राहणार, नवाब मलिकांनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सरत्या २०२१च्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला हटके नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फर्जीवाडा विरोधातील लढाई सुरुच राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रावरही मोठं प्रश्नचिन्ह नवाब मलिकांनी केलेल्या खुलाशांमुळे झाले आहे. परंतु कोर्टात प्रकरण असल्यामुळे सध्या नवाब मलिक वानखेडेंविरोधात कोणताही शब्द काढत नाही आहेत. असे असताना नवाब मलिकांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये २०२१ मध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. नवाब मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची कारवाई बोगस असल्याचा आरोप केला आहे. तसेच वानखेडेंनी बोगस जातप्रमाणपत्र आणि कागदपत्र दाखवत नोकरी मिळवली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंवर प्रतिक्रया देण्यात आली आहे. तर वानखेडेंनी न्यायालयात धाव घेत मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा देखील केला आहे. तसेच नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात आरोप किंवा कोणतेही वक्तव्य न करण्याचा कोर्टाचा निर्णय असल्यामुळे प्रकरण काही प्रमाणात शांत आहे.

- Advertisement -

हायकोर्टाचा आदेश असल्यामुळे नवाब मलिकांनी काही दिवसांपासून वानखेडेंविरोधात कोणतेही वक्तव्य केले नाही. परंतु नववर्षाच्या पूर्वसंध्येला ट्वीट करत या वादावर पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. बोगसपणाविरोधात लढाई सुरु राहणार, सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्वीट नवाब मलिक यांनी घेतले आहे. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या बोगस कारवाई आणि बोगस कागदपत्रांविरोधात लढाई सुरुच राहणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात; संजय राऊतांचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -