घरताज्या घडामोडीअनिल देशमुखांबबतचा अहवाल खरा की खोटा सीबीआयनं स्पष्ट करावं, नवाब मलिक यांची...

अनिल देशमुखांबबतचा अहवाल खरा की खोटा सीबीआयनं स्पष्ट करावं, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

Subscribe

ही कागदपत्रे खरी व सीबीआय फायलीतली असतील तर यापेक्षा जास्त राजकीय सूडबुद्धीने कोणतीही कारवाई असू शकत नाही.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय १०० कोटी रुपयांची वसूली आरोपात चौकशी करत आहेत. मात्र सीबीआयच्या प्राथमिक अहवालात अनिल देशमुख यांना १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपातून क्लिनचिट मिळाल्याची माहिती देण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सीबीआयनं या सर्व प्रकारावर स्पष्टीरण द्यावे अशी मागणी केली आहे. सीबीआयच्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्यामुळे नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून सीबीआयच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी मलिक यांनी म्हटलं आहे की, सध्या देशात खोट्या बातम्या व्हायरस सारख्या पसरत आहेत. तसेच केंद्रातील शासनकर्ते संपूर्ण माहिती देत नसल्यामुळे खऱ्या माहितीचा तपास पत्रकारांनीही करण्याची गरज आहे, असे मत देशाच्या मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे. सीबीआयचा अहवाल खरा की खोटा आहे. हे सीबीआयशिवाय कुणीही सांगू शकत नाही यामुळे सीबीआयनं याबाबत खुलासा करावा अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

- Advertisement -

एखाद्या व्यक्तीवर आरोप झालेत, गुन्हा दाखल झालाय. अशावेळी ही कागदपत्रे खरी व सीबीआय फायलीतली असतील तर यापेक्षा जास्त राजकीय सूडबुद्धीने कोणतीही कारवाई असू शकत नाही, असे स्पष्ट मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे. जर हा अहवाल खोटा असेल तर यावर चौकशी करुन त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

सीबीआयच्या अहवालात काय म्हटलंय

सीबीआयच्या अहवालात म्हटलं आहे की, अनिल देशमुख यांची आत्तपर्यंत चौकशी प्राथमिक चौकशी करण्यात आली, मात्र या प्राथमिक चौकशीदरम्यान त्यांच्याविरोधात एकही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे काहीच तथ्य नसलेली चौकशी बंद करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच चौकशीदरम्यान त्यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील चौकशी थांबवण्यात यावी. तसेच पुढची कारवाई थांबवावी. देशमुख यांच्या निवासस्थानी, वाझे आणि देशमुख यांच्यात कोणतीही बैठक झाल्याचा पुरावा नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : १०० कोटी वसुली प्रकरण : अनिल देशमुखांना CBI कडून क्लिनचिट?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -