घरताज्या घडामोडीArmaan Kohli Arrested: ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक

Armaan Kohli Arrested: ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक

Subscribe

ड्रग्ज प्रकरणी बऱ्याच वेळ चौकशी केल्यानंतर बिग बॉस सीझन ७ फेम अभिनेता अरमान कोहलीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक करण्यात आली आहे (Armaan Kohli Arrested). शनिवारी रात्री एनसीबीने अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला होता. यादरम्यान त्याच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. माहितीनुसार, ड्रग्ज पेडलरची चौकशी केल्यानंतर एनसीबी अरमान कोहलीपर्यंत पोहोचली. त्यामुळे अजूनही अरमान कोहली आणि ड्रग्ज पेडरलला आमने-सामने ठेऊन चौकशी करणे बाकी आहे.

एनसीबीने अरमान कोहलीला अटक केल्यानंतर याप्रकरणात अजून बॉलिवूडचे कोण-कोणते कलाकार सामील आहेत, याचा देखील तपास केला जाणार आहे. यामुळे एनसीबी कोर्टात अरमानची जास्तीत जास्त रिमांड मिळवण्याचा प्रयत्न करेल. अरमान कोहलीच्या अटकेनंतर आणखीन काही जणांना अटक करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काल, शनिवारी सकाळी एनसीबीने हाजीअलीजवळ छापेमारी केली. येथून मोठा ड्रग्ज पेडलर अजय राजू सिंह याला ताब्यात घेतले होते. याच्याकडून २५ ग्रॅम एमडी जप्त केले. हा हिस्ट्रीशीटर असल्याचे म्हटले जात आहे. २०१८मध्ये एनएनसी मुंबई केसमध्येही हा सामील होता. यातून मोठ्या प्रमाणात Ephedrine जप्त करण्यात आले होते. अजय राजू सिंह याच्या अटक आणि चौकशीनंतर एनसीबीने पुढील तपास सुरू केला आणि अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी करून ड्रग्ज जप्त करण्यात आले. बऱ्याच वेळ चौकशी केल्यानंतर अरमान कोहलीला अटक करण्यात आली आहे.

अरमान कोहलीवर एनडीपीएस कायद्याच्या कलम २१ (अ), २७ (अ), २८, २९, ३० आणि ३५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तर अजय राजू सिंहवर एनडीपीएस कायद्याच्या कलम २२ब (अ), २७अ, २८,२९,३० आणि ३५ अंतर्गत अटक केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तब्येत ठिक नसल्याचे कारण देत हनी सिंगने कोर्टात मारली दांडी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -