घरदेश-विदेशAmbani Scorpio case : पवारांची CM, गृहमंत्र्यांना शाबासकी, तर महाविकास आघाडीत मतभेद...

Ambani Scorpio case : पवारांची CM, गृहमंत्र्यांना शाबासकी, तर महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचा खुलासा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात योग्य कामकाज सुरु आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगले काम केले आहे अशी शाबासकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. या प्रकरणातील संशयित एपीआय सचिन वाझेंमुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असाही खुलासा शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी या संपुर्ण प्रकरणात उत्तम काम केले असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. सरकार चालवताना काही अडचणी येतात परंतु चर्चा करुन तोडगा काढण्यात येतो असे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी केरळचे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थित पी.सी. चाको यांनी पक्षप्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलही पत्रकार परिषदेत उपस्थित होते. केरळमधील पीसी चाको यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा विचार आणि राष्ट्रवादीचा केरळमध्ये डाव्यांबर जाण्याचा विचार धोरणात्मक असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे आणि सरकारमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

सचिन वाझे प्रकरणाबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तरात पवार म्हणाले की, एका पोलिस निरीक्षकामुळे सरकारचे धोरण बदलत नसते. एपीआय सचिन वाझे प्रकरणात २ राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. तपास सुरु असल्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणे योग्य वाटत नाही. परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांची चौकशी आणि तपास योग्य दिशेने सुरु आहे. कोणत्या अधिकाऱ्याने चुकीचे काम केले असेल. किंवा दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल तर तपास यंत्रणा योग्य कारवाई करतील. राज्य सरकारही त्यांच्यावर कडक कारवाई करेल. एनआयएच्या तापासात काहीही दुमत नसल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. राज्याच्या कामांबद्दल आणि भाजपशी कोणता नेता कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार यावरही चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात योग्य कामकाज सुरु आहे. राज्य सरकार चालवताना अनेक अडचणी येतात. परंतु चर्चा केल्यावर त्यावर तोडगा निघतो. सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच सरकारच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणात तसेच अनेक प्रकरणात योग्य काम केले आहे. त्यांच्या कामकाजावर शंका नसल्याचेही राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -