घरमहाराष्ट्रदोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी पालिका निवडणूक लढणार

दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी पालिका निवडणूक लढणार

Subscribe

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सातारा महानगरपालिका निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेत साताऱ्याच्या दोन्ही राजेंच्या विरोधात शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी परवानगी मागितली आहे.

सातारा महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे पॅनेल टाकलं नव्हतं. मात्र, आता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दीपक पवार यांनी शरद पवार यांच्याकडे परवानगी मागितली. यावर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असा शब्दा शरद पवारांनी दिल्याचं दीपक पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजेंच्या विरोधात पक्षाने पॅनेल टाकलं नव्हतं. शिवाय, पक्षाच्या चिन्हावर आजपर्यंत कधीच निवडणूक झालेली नाही. यावेळेस मात्र राष्ट्रवादीने पालिका निवडणूकीत पॅनेल टाकावं, अशी लोक भावना आहे. शिवाय, लोकांची मागणी असल्याने सध्या अनेक इच्छुक उमेदवार पक्षाशी संपर्क करुन स्वतंत्र पॅनेल टाकावं, अशी मागणी करत असून सातारा शहरातील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असं दीपक पवार यांनी सांगितलं.

यावर शरद पवार यांनी सर्व बाबी सकारात्मक असल्याने निर्णय घेण्यास हरकत नाही, पण पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं सांगितलं. त्यामुळे सातारा महानगरपलिकेत दोन्ही राजांच्या विकास आघाडींच्या विरोधात राष्ट्रवादी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -