Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवार गटाचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, कोहिनूर मिल प्रकरणात...

राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवार गटाचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, कोहिनूर मिल प्रकरणात…

Subscribe

कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी टुणकन उडी मारली, तशी उडी मारणारा आमचा पक्ष नाही. आम्ही सत्तेबरोबर आहोत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजप शिंदे गटासह अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मुंबई-गोवा महामार्गाबाबत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावताना त्यांची नक्कल केली. कनपट्टीवर बंदूक ठेवून भाजप लोकांना पक्षात आणत आहे आणि मग हेच लोक गाडीत लपून जातात असा टोला देखील लगावला होता. यावर आता अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

मिटकरी यांनी, शेवटी गाडीतून लपून कोण कोण जात? गाडीच्या काचा कोणाच्या काळ्या आहेत हे देखील लोकांना माहिती आहे. तर कोहिनूर मिलनंतर ज्यांना ईडीची नोटीस आली आणि त्यानंतर ज्यांनी भूमिका बदलल्या त्या लोकांनी अशी भाषा करू नये. शेवटी लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार असल्याचा टोलादेखील मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला.(  NCP leader Amol Mitkari Criticized Raj Thackeray over Statement on Ajit pawar recalled Kohinoor mill case  )

काय म्हणाले मिटकरी?

- Advertisement -

कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी टुणकन उडी मारली, तशी उडी मारणारा आमचा पक्ष नाही. आम्ही सत्तेबरोबर आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध आगपाखड करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कोहिनूरच्या माध्यमातून ईडीची नोटीस येते. मग ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपली भूमिका बदलतात. त्याचा परिणाम म्हणून ते महाराष्ट्राच्या पटलावर कुठेही दिसत नाहीत.

राज ठाकरेंकडे फक्त एकच आमदार आहे. तो आमदार त्यांनी सांभाळून ठेवावा. त्यांनी अजित पवारांची मिमिक्री करु नये. त्यांची मिमिक्री आम्हालाही करता येते. पण आम्ही काही बोललो की, त्यांची टोळधाड सुटते. त्यामुळे ते लोक ईडीची नोटीस मिळाल्यावर भूमिका बदलतात, त्यांनी अजित पवारांवर भाष्य करणं म्हणजे सुर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे, असा टोला अमोल मिटकरींना लगावला.

- Advertisement -

( हेही वाचा: दहा वर्षे सत्ता भोगूनही…, घराणेशाहीवरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल )

राज ठाकरे काय म्हणाले होते? 

राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांना विचारलं की आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले महाराष्ट्राचा विकास करायला आलो आहे. अरे कशाला खोट बोलत आहात. 6 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची.. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन भाजपसोबत आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारंना सांगितलं असणार. तुरुंगात काय काय असतं? जाऊ नका.. आपण हवं तर इथे भाजपसोबत जाऊ पण तिथे तुरूंगात नको.

- Advertisment -