घरताज्या घडामोडीजिथे दादा तिथं मी, लवकरच समीकरणं बदलतील; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

जिथे दादा तिथं मी, लवकरच समीकरणं बदलतील; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पुढील नेमकी भूमिका काय असणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार जी भूमिका घेणार ती आम्हाला शंभर टक्के मान्य असून लवकरच समीकरणं बदलणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अजित पवारांची मी थोड्याच वेळात भेट घेणार आहे. मी काल रात्रीच मुंबईमध्ये आलोय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार हे मुंबईमध्ये आले आहेत. माझा पाच ते सहा आमदारांशी संपर्क देखील झाला. मी दादांना मानणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर माझी निष्ठा आहे. दादा जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. कारण दादा जिथं जाणार तिथं मी सुद्धा जाणार आहे, असं आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.

- Advertisement -

किती आमदार अजित दादांसोबत असतील?, असा प्रश्न विचारला असता, आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, थोड्याचं वेळात समीकरणं बदलतील. ४० पेक्षा जास्त आमदार हे अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतात. परंतु या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही आम्हाला फोन आलेला नाही, असंही बनसोडे म्हणाले.

अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आणि खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही आज सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आपले दोन्ही फोन बंद ठेवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या समर्थकांना मुंबईला रवाना होण्याचे निर्देश दिले आहेत. धनंजय मुंडे बीडहून थेट मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे अजित पवार कोणती भूमिका घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ५३ पैकी ४० आमदार?, राजकीय भूकंप होण्याची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -