घरमहाराष्ट्रविशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना टार्गेट करत असल्याची शंका; ईडीच्या छापेमारीवर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना टार्गेट करत असल्याची शंका; ईडीच्या छापेमारीवर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

अंमलबजावणी संचालनालयाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कारखान्यावर छापेमारी केली आहे. या घटनेनंतर मुश्रीफांच्या कागल मतदारसंघात कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून विरोधकांनीही या कारवाईचा विरोध केला. अशात ईडीच्या कारवाईवर आता खुद्द हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदा नवाब मलिक झाले आता माझ्यावर कारवाई होणार आहे. आता किरीट सोमय्या म्हणतात की, अस्लम शेख यांच्यावर कारवाई होईल म्हणजे विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं ठरवलं की काय अशी शंका निर्माण होतेय, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यासह मुश्रीफांनी सर्व आक्रमक कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत कागल बंदची हाक मागे घेण्यास सांगितले आहे.

ईडीच्या कारवाईबाबत माहिती देताना मुश्रीफ म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या नातेवाईकांच्या घरावर त्यानंतर माझ्या मुलीच्या घरावर ईडी छापे घातल्याचे समजते. मी काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मला दूरध्वनीवरून ही बातमी समजली आहे. कारखाना, निवासस्थान आणि काही नातेवाईकांची घरं ही तपासण्याचं काम सुरु आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी शांतता ठेवावी. प्रसारमाध्यमांमध्ये पाहिलं कागल बंदची घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी आणि सरकारी अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावं. कोणताही दंगा धोका आणि कायदा सुव्यवस्था अडचणीत आणणारं असं कोणतही कृत्य करु नये, असं आवाहन मुश्रीफ यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना केलं आहे.

- Advertisement -

मुश्रीफ पुढे म्हणाले की, याआधी दीड, दोन वर्षांपूर्वी अशाप्रकारचे छापे पडले होते, सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतली होती, तरी पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आला आहे याची मला माहिती नाही. वास्तविक ३०-३५ वर्षांच माझं सार्वजनिक जीवन हे सर्व लोकांच्या समोर आहे. त्यामुळे दीड – दोन वर्षांपूर्वी झालेल्या कारवाईतून काहीचं निष्पण्ण झालं नव्हतं, पुन्हा कोणत्या हेतून हा छापा घालण्यात आला हेही समजत नाही. मी सगळी कल्पना घेऊन प्रसार माध्यमांसमोर खुलासा करेन, परंतु सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

चार दिवसापूर्वी कागल तालुक्यातील भाजपचे एक नेते यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळी चकरा मारून माझ्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते, अतिशय जबाबदारी सांगतो, त्यांनी सांगितलं होत की, चारचं दिवसात मुश्रीफांवर ईडीची कारवाई होणार आहे. अशापद्धतीने नाउमेद करण्याचं काम, हे जे चाललं आहे ते अतिशय गल्लिच्छ राजकारण आहे. कारण जर राजकारणात अशापद्धतीने कारवाया होणार असतील तर सर्वत्र निषेधचं झाला पाहिजे, अशी मागणीही मुश्रीफांनी केली आहे.

- Advertisement -

हसन मुश्रीफांविरोधातील कारवाईनंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून मुश्रीफांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. यानंतर पुन्हा पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांना अडवले. यानंतर संपप्त कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे. या छापेमारीमुळे कागलमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला आहे. मात्र मुश्रीफांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे.


भाजप आणि शिंदे गटात ‘या’ मुद्द्यांवरून मतभेद; ‘मोठं’ कारण आलं समोर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -