घरताज्या घडामोडीआता वळू नका, रणि पळू नका...; सीमाप्रश्नी जितेंद्र आव्हाडांचे आव्हान

आता वळू नका, रणि पळू नका…; सीमाप्रश्नी जितेंद्र आव्हाडांचे आव्हान

Subscribe

कर्नाटक आणि महाराष्ट्राती सीमावादावरून गेल्या काही दिवासंपासून वादंग निर्माण झाला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटक सरकारचा आणि कन्नड रक्षण वेदिके संघटनेचा निषेध केला.

कर्नाटक आणि महाराष्ट्राती सीमावादावरून गेल्या काही दिवासंपासून वादंग निर्माण झाला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटक सरकारचा आणि कन्नड रक्षण वेदिके संघटनेचा निषेध केला. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे ह्यानी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लिहलेला हा पोवाडा ट्विटरवर शेअर करत मागे न वळण्याचे सर्वांना आव्हान केले आहे. (NCP MLA Jitendra Awhad Talk On Maharashtra Karnataka Border Issue)

“महाराष्टानं गुढी उभारली विजयाची. दाखविली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परि तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची. गांवाकडं मैना माझी. भेट नाही तिची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची. धोंड खंडणीची. कमाल दंडेलीची. चीड बेकीची. गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची. आता वळू नका. रणि पळी नका. कुणी चळु नका. बिनी मारायची अजून राहिली”, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे ह्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लिहलेला हा पोवाडा जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, कर्नाटक आणि महाराष्ट्राती सीमावादावरून गेल्या काही दिवासंपासून वादंग निर्माण झाला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रविरोधी वातावरण निर्माण झाल्याने सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा अशी मागणी मविआच्या खासदारांनी केली आहे. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी आज अमित शाहा यांची भेट घेतली असून अमित शाहा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी १४ डिसेंबरला चर्चा करणार आहेत.

याशिवाय, कर्नाटकमधील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी वाढलेली दिसतेय. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं कार्यकर्त्यांनी गदगमध्ये दहन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्याने कर्नाटकातील मराठी भाषिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसंच, मराठी भाषिक भागात महाराष्ट्रविरोधी लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचाही आरोप करण्यात येतोय. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गदगमध्ये महाराष्ट्राविरोधात जोरदार निर्दशने केली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सीमावाद चिघळला, कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचे दहन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -