घरमहाराष्ट्रश्रद्धा वालकरच्या वडिलांचे वसई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले असहकार्यामुळे...

श्रद्धा वालकरच्या वडिलांचे वसई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले असहकार्यामुळे…

Subscribe

Shraddha Murder Case | श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. लिव्ह इनमध्ये तिच्यासोबत राहणारा तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने मे महिन्यात तिची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने जवळच्या जंगलात फेकून दिले आहेत. हे प्रकरण नोव्हेंबर महिन्यात उजेडात आल्यानंतर देशभर एकच खळबळ माजली. याप्रकरणातील नियमित अपडेट्स रोज समोर येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत माध्यमांपासून लांब राहिलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई – वसईच्या तुळींज आणि मणिपूर पोलिसांनी असहकार्य केले. तसं झालं नसतं तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडिल विकास वालकर यांनी आज केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपा नेते किरिट सोमय्यासुद्धा उपस्थित होते. या पत्रकार परिषदेआधी विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. लिव्ह इनमध्ये तिच्यासोबत राहणारा तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने मे महिन्यात तिची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने जवळच्या जंगलात फेकून दिले आहेत. हे प्रकरण नोव्हेंबर महिन्यात उजेडात आल्यानंतर देशभर एकच खळबळ माजली. याप्रकरणातील नियमित अपडेट्स रोज समोर येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत माध्यमांपासून लांब राहिलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

वसई येथील तुळींज पोलीस ठाणे आणि मणिपूर पोलीस ठाण्याच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे मला त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी. जर तसं झालं नसतं तर माझी मुलगी जिवंत असती. किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली नसती. मला माझ्या मुलीसाठी न्याय मिळावा यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे, असं विकास वालकर म्हणाले.

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे, आफताब पुनावाला याने श्रद्धाची अत्यंत क्रुरपणे हत्या केली असून त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. या कटात सहभागी असलेल्या अफताबच्या कुटुंबीयांनाही जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. तसंच, कटात सहभागी असणाऱ्या इतर लोकांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकर यांनी यावेळी केली.

- Advertisement -

किरीट सोमय्यांनी केली मदत

श्रद्धा हत्याप्रकरण उजेडात आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विकास वालकर यांना मदत केली. विकास वालकर यांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास, राहण्याची- खाण्याची सोय किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली, अशी माहिती विकास वालकर यांनी आज दिली.

दिल्लीतून न्याय देण्याचे आश्वासन

दिल्लीचे राज्यपाल आणि दक्षिण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी याप्रकरणात मला भेटून आश्वासन दिले आहे. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनीही न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस, वसई पोलीस संयुक्तपणे व्यवस्थित कारवाई करत असल्याचंही विकास वालकर यांनी सांगितलं.

विकास वालकर यांनी याप्रकरणात आपलं मत मांडतानाच काही मुद्द्यांवर गंभीर चर्चा व्हायला पाहिजे असंही म्हटलं आहे. ते म्हणाले की, १८ वर्षांनंतर मुलीला जे स्वातंत्र्य दिले जाते, त्यावर विचार व्हायला हवा. धर्मजागृतीवर भर दिला गेला पाहिजे. माझ्या मुलीचे जे झालं ते अत्यंत दुखदायक असून यापुढे असे कोणाचेही होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे, असं विकास वालकर म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -