घरमहाराष्ट्रआर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू अशी भीती वाटते - रोहित पवार

आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू अशी भीती वाटते – रोहित पवार

Subscribe

आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठत आहे.

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन घरा बाहेर पडायला हवं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं. आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठत आहे. आपण असंच घरात बसून राहिलो तर संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल अशी भीतीही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत तरुणांना मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचं आवाहन केलं.

काय लिहिलं आहे फेसबुकवर?

कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन केल्याने गेली काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलत आहे. लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. तरीही लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण आहे. पण योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावं लागेल. कारण गेल्या दोन-तीन महिन्यात आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठतोय. आपण असंच घरात बसून राहिलो तर या संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल, अशी भीती रोहित पवारांना वाटतेय.

- Advertisement -

कोरोनाला हरवण्यासाठी लॉक डाऊन केल्याने गेली काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉक डाऊनमध्ये मोठ्या…

Posted by Rohit Rajendra Pawar on Wednesday, 10 June 2020

मुलांनी आता पालकांवर जबाबदारी न टाकता त्यांची काळजी घेऊन आणि स्वतः पुढे येऊन जबाबदारी घ्यायला पाहिजे. वयोमानानुसार शुगर, किडनी, हार्ट, मधुमेह, दमा, रक्तदाब अशा प्रकारचे आजार पालकांना असू शकतात. त्यामुळे अशा पालकांनी तसंच गर्भवती महिला आणि ५५ वर्षांपुढील नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन मुलांना नोकरीसाठी पाठवणं फायद्याचं ठरेल. पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोर पाळून पुन्हा घरी जाणं टाळायला पाहिजे, असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे.

- Advertisement -

आज खासगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहीत नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे. पण आपण असंच घरात बसून राहिलो तर अडचणी वाढू शकतात. कंपन्यांमध्ये तरुणांना बोलावलं तर ते लगेच कामावर जॉईन होण्यास तयार नसतात. काहीजण सवडीने किंवा दोन महिन्यांनी किंवा कोरोना संपल्यावर जॉईन होऊ असं सांगतात. पण मला वाटतं कामाच्या बाबतीत जर आपण अशी कारणं देत बसलो तर त्याने आपलच नुकसान होईल. याउलट कोरोनाच्या भितीला झुगारून देऊन काम करावं लागेल. पण याचा अर्थ असाही नाही की पुन्हा पहिल्यासारखंच रहायचं. उलट यापुढं आपलं सार्वजनिक जिवनातील वागणूक अधिक जबाबदारीने ठेवावी लागणार आहे. नियम आणि शिस्त याची लक्ष्मणरेषा कोणालाही ओलांडता येणार नाही. फेरफटका मारण्यासाठी किंवा सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर जाण्याच्या सवयीला मुरड घालून अनावश्यक बाहेर पडून गर्दीचा एक भाग होणं टाळावं लागेल. “मला स्वतःला कोरोना झाला आहे म्हणून त्याचा दुसऱ्याला संसर्ग होऊ नये आणि इतर सर्व लोकांना कोरोना झाला असल्याने त्याचा संसर्ग मला व्हायला नाही पाहिजे,” असं प्रत्येकाने समजून घेऊन काळजी घ्यावी लागणार आहे. पण त्याऐवजी आपण घाबरून घरात बसलो तर आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय, याचीच अधिक भीती वाटत असल्याचं रोहित पवार म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -