घरताज्या घडामोडीअखेर तो आला! राज्यात मान्सूनचं झोकात आगमन!

अखेर तो आला! राज्यात मान्सूनचं झोकात आगमन!

Subscribe

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनसाठी योग्य असं वातावरण निर्माण झालं असून आज दुपारी मान्सूननं महाराष्ट्राची सीमा ओलांडली. सोलापूरमधून मान्सूननं महाराष्ट्रात प्रवेश केला असून आता तळकोकणात दमदार हजेरी देखील लावली आहे. पुढच्या काही वेळामध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, कुलाबा वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाराष्ट्राच मान्सूनचं आगमन झाल्याची ‘गुड न्यूज’ दिली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना आता वेग येण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

यासोबतच देशाच्या इतर भागातही मान्सून वेगाने सक्रीय होण्याचा अंदाज आहे. यामध्ये तामिळनाडू, गोवा, कर्नाटकचा काही भाग, तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग यांचा समावेश आहे. तसेच, पूर्वेकडच्या काही राज्यांमध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या टापूत येणाऱ्या भारतीय भागात पुढच्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसासाठी परिस्थिती अनुकूल झाल्याचं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -