Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र CBI च्या कारवाईनंतर नागपुरात वातावरण तापलं; देशमुखांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर

CBI च्या कारवाईनंतर नागपुरात वातावरण तापलं; देशमुखांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने धाडी टाकल्यानंतर नागपुरात वातावरण तापलं आहे. अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापे मारले. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या धाडीचा राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी निषेध केला आहे. नागपुरात कार्यकर्ते देशमुखांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. देशमुखांवरील कारवाई म्हणजे केंद्राचं सूडाचं राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.

अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची साडेसहा तास झाडाझडती

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळी सीबीआयनं छापा टाकला. जवळपास साडे सहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे. १२ अधिकाऱ्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर 9 ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे.

 

- Advertisement -