घरमहाराष्ट्रनाशिकनवनियुक्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पदभार स्वीकारताच केला इरादा स्पष्ट, म्हणाले...

नवनियुक्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पदभार स्वीकारताच केला इरादा स्पष्ट, म्हणाले…

Subscribe

नाशिक : केंद्र व राज्य शासनाकडून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे, शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला सेवा देणे या बाबींना माझे प्रथम प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूकांचे नियोजन आणि महत्वाचे म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने माझे नियोजन असेल. सर्वच क्षेत्रात नाशिक राज्यात कसे पुढे राहील यासाठी मी कटीबध्द असल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ‘माय महानगर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

धुळयाचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. बदलीचे आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवार दि. २२ रोजी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होत पदभार स्विकारला. यावेळी ‘माय महानगर’शी बोलतांना त्यांनी सांगितले की, नाशिक हा मोठा जिल्हा आहे. मोठया प्रमाणावर आदिवासी तालुक्यांचा हा जिल्हा आहे. प्रत्येक अधिकार्‍याला नाशिकमध्ये काम करण्याची इच्छा असते. मला ती संधी मिळाली याचा आनंद आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. याकरीता प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात येते. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे याकरीता माझे प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

याच सोबत, शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवांचा लाभ दिला जात आहे. यामाध्यमातून शासकीय सेवा सहजरित्या उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्राधान्य असेल. लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नियोजन केले जाईल. २०२७ मध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू करण्यात येणार आहे. कुंभमेळयाच्या निमित्ताने येणारे साधू, महंत विविध आखाड्यांचे प्रतिनिधी तसेच जगभरातून नाशिकमध्ये येणार्‍या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने आतापासूनच नियोजन केले जाईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -