घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजपचा सत्तेसाठी नंगा नाच; नितेश राणेंची टीका

शिवसेना-भाजपचा सत्तेसाठी नंगा नाच; नितेश राणेंची टीका

Subscribe

शिवसेना-भाजपा युती झाली असली तरी या दोन्ही पक्षांमधला कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. त्यातच आता मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षात जुंपली आहे. आता यावरून विरोधकांनी देखील तोफ डागायला सुरुवात केली आहे. आमदार नितेश राणे यांनी युतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन पहिली ठिणगी पडल्याचे सांगत याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले नितेश राणे –

‘युती मध्ये पहिली ठिणगी कश्यामुळे ?? राम मंदिर..नाही !, शेतकरी ?… नाही !, नाणार रद्द ? .. नाही!, बेस्ट कामगार ? … नाही!!…मग कश्यासाठी ? मुख्यमंत्री आमचाच!!’. मुख्यमंत्रीदावरुन भाजपा शिवसेनेत सुरु असलेल्या या वादाला त्यांनी याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच अशा शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

नेमका वाद काय?

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षांचा असे सूत्र ठरलेले नाही, तर ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम म्हणाले की, असे काही ठरलेलं नसून, आमदार पाडापाडीचे धंदे सुरू होतात. त्यामुळे आम्ही अडीच अडीच वर्षांची अट ठेवली आहे. जर हे मान्य नसेल तर युती तोडा असे रामदास कदम यांनी म्हटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -