घरमहाराष्ट्रनितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका; म्हणाले, "स्वतःच्या मालकाचा..."

नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका; म्हणाले, “स्वतःच्या मालकाचा…”

Subscribe

संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला प्रतित्युत्तर देण्याची जबाबदारी भाजपने आमदार नितेश राणे यांना दिली आहे. नितेश राणे हे देखील त्यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसून येत आहेत.

मुंबई : संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला प्रतित्युत्तर देण्याची जबाबदारी भाजपने आमदार नितेश राणे यांना दिली आहे. नितेश राणे हे देखील त्यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसून येत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या टीकेला नितेश राणे नेमके काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. त्यामुळे राज्यातील राजकारणात या दोघांच्या वाद-प्रतिवादामुळे कायमच राजकीय नाट्य पाहायला मिळत असते. (Nitesh Rane’s criticism of Sanjay Raut)
आज (ता. 26 जून) नितेश राणे यांनी सामनातील अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच संजय राऊतच्या बुद्धीचे कौतुक करतो. हा स्वतःच्या मालकाचा वाभाडा काढणारा हा कामगार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे….जे जे त्यांना आडवे आले त्यांना त्यांना त्यांनी संपवले आहे.संजय राऊतच्या बुद्धीचे कौतुक करतो.स्वतःच्या मालकाचा वाभाडा काढणारा हा कामगार आहे. उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला.एका कोपऱ्यात मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेला टाकण्यात आले. मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते आणि अनिल परब आणि लोक शेंबड्या पोरांसारखे मोर्चा काढता आहेत.
पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल, पण लोकशाही मार्गाने. पाटण्यातील ‘ वॅगनर ग्रुप ‘ ने तोच इशारा दिला!, असे आजच्या सामन्याच्या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे. याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊतला वॅगनर ग्रुपचा इतिहास माहीत तरी आहे काय. थोडी माहिती घेतली असती तर विरोधकांच्या पाटणा बैठकीला वॅगनर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती. संजय राऊत घरफोड्या आहे. वॅगनर ग्रुपचा लीडर नाझी विचारसरणीचा होता.संजय राऊतला पाटण्यात भेटलेले पण नाझी विचारसरणीचे आहेत असे म्हणायचे आहे का?, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -