घरमहाराष्ट्रपुण्यातील हेल्मेट सक्ती टळली; मुख्यमंत्र्यांची स्थगिती!

पुण्यातील हेल्मेट सक्ती टळली; मुख्यमंत्र्यांची स्थगिती!

Subscribe

अखेर मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील हेल्मेट सक्तीला स्थगिती दिली आहे. पुण्यातील आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

ज्यावेळी पुण्यात हेल्मेट सक्ती केली त्यावेळी पुणेकरांनी कडाडून विरोध केला. हेल्मेट विरोधात पुणेकरांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले. आता पुणेकरांच्या या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. पुण्यातील सर्व आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी हेल्मेट सक्तीला स्थगिती द्यावी अशी मागणी केली. यावेळी हेल्मेट सक्तीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अखेर मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांना हेल्मेट सक्ती करू नयेत अश्या सुचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शहरी आणि नागरी भागात हेल्मेटसक्ती स्थगित करण्याची मागणी मान्य केली. त्यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली.

- Advertisement -

पुणे शहरात पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली. याचा फटका दुचाकी चालकांना मोठ्या प्रमाणावर बसतो. या कारवाईबाबात आणि दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने सर्व आमदरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे माधुरी मिसाळ म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -