घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रINDIA हे नाव कुणीही हटवू शकणार नाही; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान

INDIA हे नाव कुणीही हटवू शकणार नाही; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान

Subscribe

जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले.

जळगाव : संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक आणून केंद्र सरकार इंडिया आघाडीतील INDIA हा शब्द बदलण्याच्या तयारीत आहे, यावर बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला खुले आव्हान दिले असून, कुणीच हे नाव बदलू शकत नाही, तसा अधिकारच कुणाकडे नाही असेही ते यावेळी म्हणाले.(No one can remove the name INDIA; Sharad Pawar’s challenge to the central government)

जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे यावर मत विचारले असता शरद पवारांनी थेट केंद्र सरकारच निशाणा साधला.

- Advertisement -

काय म्हणाले शरद पवार?

इंडिया आघाडीच्या नाव बदलण्याच्या विधेयकाच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मला तशी काही माहिती नाही. उद्या मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठक बोलावली आहे. इंडिया बैठकीत सहभागी झालेले पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची उद्या बैठक आहे. या बैठकीत या गोष्टींचा विचार होईल. पण, हे नाव हटवण्याचा आधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही, देशाशी निगडीत असलेले नावांबाबत अस्वस्थता सत्ताधारी पक्षांना का असते हे मला समजतं नाही, असे म्हणत शरद पवारांनी थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला.

हेही वाचा : शरद पवारांनी सरकारला सुचवले दुष्काळ निवारणाचे उपाय; जळगावसह राज्यातील स्थिती भयावह

- Advertisement -

पक्षात फूट पडल्यानंतर जळगावात पहिली सभा

राष्ट्रवादी पक्षात बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांच्या समर्थक आमदारांचा समाचार घेण्यासाठी शरद पवार गट सरसावला आहे. आधी येवला, नंतर बीड, बीडनंतर थेट कोल्हापूर गाठत शरद पवांरानी हसन मुश्रीफ यांच्यावर शरसंधान साधले होते. त्यानंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडणार आहे. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी ही तीन वाजता ही जाहीर सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची ही पहिली सभा आहे.

हेही वाचा : फडणवीसांनी मागितली ना माफी? शरद पवारांचा टोमणा

एका वाक्यात टाकला वादावर पडदा

राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20च्या निमंत्रण पत्रिकेवर President Of India च्या ऐवजी President Of Bharat लिहण्यात आले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, इंडिया काय किंवा भारत काय मला त्यावर वाद घालायचा नाही, असे म्हणत एका वाक्यात या वादावर पडदा टाकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -