घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'तलाठी भरतीसाठी १२ लाखांची ऑफर?'; बेरोजगारांना फसवणारी टोळी सक्रिय

‘तलाठी भरतीसाठी १२ लाखांची ऑफर?’; बेरोजगारांना फसवणारी टोळी सक्रिय

Subscribe

नाशिक : राज्यात सध्या तलाठी पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीत आपले काम करून देतो असे आमिष दाखवत तब्बल १२ लाख रूपयांची मागणी केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. यामागे बेरोजगारांना लुटणारी टोळी कार्यरत असल्याचे सांगितले जाते आहे.

सरकारी नोकरीची क्रेझ आजही कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकर्‍यांचे प्रमाण कमी झाल्याने आणि स्थानिक पातळीवरील भरती आयोगातील घोटाळ्यांमुळे अनेक तरुणांनी रोष व्यक्त केला होता. केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकले. यासाठी ७५ हजार नोकर्‍या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, आता सरकारी नोकरीसाठी राबविण्यात येणार्‍या भरतीप्रक्रियेतच बेरोजगारांची लुटमार केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट – क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

- Advertisement -

ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. जिल्ह्याप्रमाणे व झोनप्रमाणे या भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या असून, येनकेनप्रकारे सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी तरूणांची धडपड सुरू आहे. हीच संधी साधत मालेगाव शहरात तलाठी भरतीसाठी ठगांची टोळी सक्रीय झाल्याचे समजते.

या माध्यमातून शासकीय नोकरीत लावून देतो माझी वरपर्यंत ओळख आहे असे आमिष दाखवून थेट आर्थिक लुट सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. यात काही राजकीय पक्षांशी संबंधित लोकही सहभागी असल्याचे समजते. अमूक एका मंत्र्याकडे माझा वशिला आहे. त्यांच्याशी माझी चांगली ओळख आहे, असे सांगत निघाल्याचे समजते. त्यामुळे ही भरती प्रकिया पारदर्शक पध्दतीने राबविण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -