घरमहाराष्ट्रपुणेPankaja Munde : ऊसतोड कामगारांची मजुरी वाढली, पण त्यांच्या पाल्यांचं काय? मुंडेंचा...

Pankaja Munde : ऊसतोड कामगारांची मजुरी वाढली, पण त्यांच्या पाल्यांचं काय? मुंडेंचा सरकारला सवाल

Subscribe

राज्यात उसाच्या तोडणीसाठी मजुरी दरात 93 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांची मजुरी प्रति टन 274 रुपयांवरून 367 रुपये झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीने गुरुवारी या प्रश्नावर अखेर तोडगा काढण्यात आला.

पुणे : ऊसतोड कामगारांची मजुरी वाढविण्यासंदर्भात गुरुवारी (4 जानेवारी ) झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. आता ऊसतोड कामगारांना प्रति टन 274 रुपयाएवजी 367 रुपये एवढी मजुरी मिळणार आहे. झालेल्या बैठकीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. ऊसतोड कामगारांची मजुरी जरी वाढली असली तरी त्यांच्या विम्याचे आणि त्यांच्या पाल्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे मुंडेंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. (Pankaja Munde Wages of sugarcane workers increased but what about their children Mundes question to the government)

राज्यात उसाच्या तोडणीसाठी मजुरी दरात 93 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांची मजुरी प्रति टन 274 रुपयांवरून 367 रुपये झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीने गुरुवारी या प्रश्नावर अखेर तोडगा काढण्यात आला.

- Advertisement -

ऊसतोड कामगारांच्या मजुरी वाढविण्या संदर्भात पार पडलेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मजुरी संदर्भात निर्णय घेण्यात आला. यामध्ये ऊसतोडणी कामगारांच्या मूळ मजुरीत 34 टक्के एवढी तर मुकादमांच्या कमिशनमध्ये एका टक्का वाढ करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने यंदाच्या हंगामाच्या प्रारंभापासून लागू असून, तीन वर्षांसाठी राहणार आहे अशीह माहिती पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा : Sanjay Raut: राज्यात आणि देशात घटनाबाह्य सरकार; राऊतांचा आरोप, म्हणाले, ‘हे देशातील लोकशाहीचं …

- Advertisement -

कामगारांनी दिली होती कोयता बंदची हाक

ऊसतोडणीच्या मजुरीदरात किमान चाळीस टक्के वाढ करण्याच्या मागणीसाठी ऊसतोडणी, वाहतूक कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र, त्यामध्ये तोडगा निघत नसल्याने ऊसतोड कामगारांनी कोयता बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे ऊसतोडणीचे काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर पंकजा मुंडे आणि शरद पवार यांनी बैठक घेऊन याप्रकरणी तोडगा काढला.

हेही वाचा : Congress : मतभेद विसरून एकत्र यावे लागेल, खर्गे यांचे पक्षनेत्यांना आवाहन

यामुळे आहेत पंकजा मुंडे सरकारवर नाराज

पार पडलेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या वाढलेल्या मजुरी संदर्भात माहिती दिल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त केले. महामंडळात ऊसतोड कामगारांच्या हिताचे काम झाले पाहिजे, उसतोडणी कामगारांचा विम्याचा प्रश्न, त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, यासाठी निर्वाणीचा इशारा देणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असाही इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -