घरमहाराष्ट्रआमचे नेते रस्त्यावर लढतात, कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही; नाना पटोलेंचा ममतादीदींवर पलटवार

आमचे नेते रस्त्यावर लढतात, कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही; नाना पटोलेंचा ममतादीदींवर पलटवार

Subscribe

जे रस्त्यावर लढतात त्यांना आम्ही घेऊन जाणार असं वक्तव्य करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. आमचे नेते रस्त्यावर लढतात, कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी परदेशात जाऊन लढता येणार नाही. तसंच, जे रस्त्यावर लढतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावर नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. आमचे नेते रस्त्यावर लढतात, कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. कोण विदेशात जातात, राहतात हे देशातील जनतेला माहिती आहे. आपणच स्वत: विदेशात रहायचं आणि दुसऱ्याला विदेशात सांगायचं. आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. प्रियंका गांधी, राहुल गांधी रस्त्यावर लढत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करणारी व्यवस्था या देशात आहे. २०१९ मध्ये सुद्धा असा प्रयत्न त्या व्यक्तीमत्त्वाने केला होता. हे काही देशाची जनता विसरलेली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला अप्रत्यक्षरित्या फायदा मिळवून देण्याची व्यवस्था आणि त्या पद्धतीचा जर असेल ते घृणास्पद आहे, अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली.

देश धोक्यात आला आहे. देशातील संविधान धोक्यात आलं असून त्यावर बोलायला पाहिजे. जे बोलायला तयार नाहीत. काँग्रेस देशासाठी आणि देशाच्या संविधानीक व्यवस्थेसाठी लढली आणि जगली. आजही काँग्रेसची तीच भूमिका राहणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी…’; अशोक चव्हाणांनी शेअर केला विलासराव देशमुखांचा तो व्हिडिओ


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -