घरक्रीडाBWF World Tour Finals : पी.व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतची विजयी सलामी

BWF World Tour Finals : पी.व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतची विजयी सलामी

Subscribe

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतने बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या अंतिम फेरीत विजयाने सुरूवात केली आहे

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतने बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या अंतिम फेरीत विजयाने सुरूवात केली आहे. दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या सिंधूने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या लिन क्रिस्टोफरसनचा २१-१४, २१-१६ अशा फरकाने पराभव केला. हा सामना ३८ मिनिटे सुरू होता अखेर सिंधून विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. २०१८ मधील चॅम्पियनचा दुसरा सामना जर्मनीच्या यव्होन लीशी होणार आहे. जागतिक पातळीवर काही काळ अव्वल स्थानी राहिलेल्या किदांबी श्रीकांतने फ्रांन्सच्या टोमा ज्युनियर पोपोवचा ४२ व्या मिनिटांत २१-१४, २१-१६ अशा फरकाने पराभव केला.

दरम्यान, अल्मोडाच्या लक्ष्य सेनने विजयासोबत पदार्पण केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आणि दोन वेळचा विश्वविजेता केंटो मोमोटा याने २० वर्षीय लक्ष्य विरुद्धच्या सामन्यातून एका मिनिटाने माघार घेतली. त्यानंतर पहिल्या गेममधील धावसंख्या तशीच राहिली. त्यामुळे लक्ष्यला विजय मिळवण्यात यश आले.

- Advertisement -

महिला दुहेरीच्या फेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना त्यांच्याच गटातील सलामीच्या लढतीत जपानच्या नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा या दुसऱ्या मानांकित जोडीकडून १४-२१, १८-२१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. तर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनाही डेन्मार्कच्या किम अस्ट्रुप आणि अँडर्स स्करुपकडून १६-२१, ५-२१ अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.


हे ही वाचा: http://पेंग शुईच्या चिंतेमुळे WTA चा मोठा निर्णय; हाँगकाँगसह चीनमधील सर्व स्पर्धा केल्या स्थगित

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -