घरमहाराष्ट्रपद्मसिंह पाटलांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती- अण्णा हजारे

पद्मसिंह पाटलांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती- अण्णा हजारे

Subscribe

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आज, मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतील सीबीआय कोर्टात आपली साक्ष नोंदवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती असे अण्णांनी आपल्या साक्षीत नमूद केलेयावेळी सीबीआय न्यायालयात दिलेल्या साक्षीत अण्णांनी सांगितले की, “तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही.

पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे नातेवाईक आहेत त्यामुळे माझ्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही. मला मिळालेल्या धमकीबाबत मी तत्कालिन मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना दाद मागितली होती. याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र हे पुरस्कारही परत केले. मात्र कशाचाही उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून मी उपोषणाला बसलो, त्यानंतर सरकारने पी. बी. सावंत आयोगाकडे भ्रष्टाचाराची चौकशी सोपवण्यात आली.”

- Advertisement -

या चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. याच गोष्टीचा राग मनात ठेवून पद्मसिंह पाटील यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला. मी तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबावही टाकण्यात आला होता. एकदा माझ्या कार्यालयात येऊन पद्मसिंह पाटील यांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्याकडे कोरा चेक सोपवला, आणि सांगितलं हवी ती रक्कम टाका असा प्रस्ताव देण्यात आल्याचे अण्णा हजारे यांनी न्यायालयात दिलेल्या आपल्या साक्षीत नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -