घरमहाराष्ट्रPandharpur Marathon : खासदारांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले अन् स्वतः 21 किलोमीटर धावले

Pandharpur Marathon : खासदारांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले अन् स्वतः 21 किलोमीटर धावले

Subscribe

ढरपूर मॅरेथॉन संपल्यानंतर आयोजकांनी ओमराजे निंबाळकरांना मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सोलापूर : राजकीय नेते मंडळी मॅरेथॉनला फक्त हिरवा झेंडा दाखवण्यासाठी येतात. या मॅरेथॉनमधील विजेत्या धावपटुना बक्षीत देतात. पण आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आपण पाहिले नाही. यात ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर हे अपवाद आहेत. आता तुम्हाला वाटले की, ओमप्रकाश निंबाळकर यांनी असे काय केले की हे अपवाद झाले, तर आज पंढरपुरातील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथोनमध्ये ओमप्रकाश निंबाळकर यांनी स्वत: सहभागी झालेच. यात 21 किमी मीटरच्या स्पर्धेत धावून आपला फिटनेसही दाखवला.

आज पंढरपूर येथे डीव्हीपी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये पंढरपुरातील अनेक हौशी धावपटू सहभागी झाले होते. या मॅरेथॉनच्या आयोजनात शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत पाटील हे देखील होते. यात धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हेही या मॅरेथॉनच्या उद्घाटनला हजर होते. पण यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी मॅरेथॉनला हिरवा कंदील तर दाखविला. या मॅरेथॉनसाठी ओमराजे निंबाळकर हे आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मैदानात आले. यावेळी निंबाळकरांनी वॉर्म अप कारण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत स्वत: सहभागी देखील झाले. यावेळी ओमराजे निंबाळकरांनी स्पर्धेत सहभाही झाल्यामुळे सर्वांच आश्चर्याचा धक्का बसला.

- Advertisement -

हेही वाचा – Chhagan Bhujbal : “राजीनामा मंजूर होत नाही…”, छगन भुजबळांचे सूचक विधान

या मॅरेथॉनसाठी ओमराजे निंबाळकर हे आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मैदानात आले. यावेळी निंबाळकरांनी वॉर्म अप कारण्यास सुरुवात केली. यानंतर 21 किलोमीटरची मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर ओमराजे निंबाळकारांनी त्यास सहभागी झाल्यानंतर त्यावेळी सर्वांच आश्चर्याचा धक्का बसला.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : गद्दारांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार- उद्धव ठाकरे

निंबाळकरांना मिळाले मॅडल

यापूर्वी सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांचा सायकलिंग आणि रनिंग करतानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. पण आज मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन ओमराजे निंबाळकरांनी त्यांचा फिटनेस सर्वांच दखविला. पंढरपूर मॅरेथॉन संपल्यानंतर आयोजकांनी ओमराजे निंबाळकरांना मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. लोकसभा निवडणूक ही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच, यासाठी ओमराजे निंबाळकर सज्ज असल्याचे त्यांनी फिटनेसद्वारे दाखविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -